Pushpa 2 Esakal
मनोरंजन

Pushpa 2: टॉलिवूडला 'पुष्पा' पडला चांगलाच महागात! तगडी फी घेवून अल्लू अर्जून पेटवणार फायर...

Vaishali Patil

सध्या मनोरंजन विश्वात 'पुष्पा' चीच भलतीच चर्चा आहे. पुष्पाच्या द राइजला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल. त्याताच परिणाम म्हणजे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आता या चित्रपटाच्या यशानंतर चाहते पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पुष्पा मधील श्रीवल्ली,सामी सामी,ओ अंटवा  या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती दिली तर  'मैं झुकेगा नहीं साला', 'फ्लावर नहीं फायर है'  या पुष्पा चित्रपटामधील डायलॉग्सनं तर प्रेक्षकांना वेड लावलं. अजूनही यांची चर्चा आहे.

आता चाहते 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटाविषयी अपडेट जाणुन घेण्यासाठीही उत्सुक आहेत. नुकतच निर्मात्यांनी 'पुष्पा 2' चा टीझर रिलीज केला आहे. 3 मिनिट 14 सेकंदाच्या हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला. चाहत्यांना तो खुप आवडत.

अल्पावधीतच याच्या टीझरला भरपूर लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. मात्र या चित्रपटातील अल्लू अर्जूनच्या नव्या पोस्टरनं सर्वांच लक्ष वेधलं. या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन भरजरी साडी नेसलेली दिसत आहे. कानात झुमके, हातात बांगड्या अन् गळ्यात ज्वेलरी आणि गळ्यात लिंबाची माळ घातली आहे. अशा अल्लू अर्जुनच्या लूकनं त्याच्या चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

त्यामुळे 'पुष्पा 2' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवकर नवे रेकॉर्ड तयार केरेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने मोठी रक्कम घेतली असल्याचा दावा रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. बातम्यांनुसार अल्लू अर्जुनने या चित्रपटासाठी जवळपास 85 लाख रुपये फी घेतली आहे.

याबाबत अद्याप अधिकृत मिळालेली नसली तरी, मात्र हे असेल तर तेलुगू चित्रपटसृष्टीतील हा एक नवा विक्रम ठरेल. अल्लू अर्जुनसोबत या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल हे देखील दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT