Sanjay Dutt Latest News esakal
मनोरंजन

Pushpa 2 मध्ये होणार संजूबाबाची एंट्री, अल्लू अर्जुन सोबत दिसणार 'या' भूमिकेत?

अल्लू अर्जुनच्या पुष्पा २ (Allu Arjun Pushpa 2) मध्ये बॉलीवूडच्या खलनायकाची एंट्री होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

युगंधर ताजणे

Pushpa 2 the Rule Allu Arjun Lead Role : साऊथच्या पुष्पा चित्रपटानं चाहत्यांवर वेगळ्या प्रकारचे गारुड केले होते. त्याच्या पहिल्या भागाला (Pushpa 2) प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर त्याच्या २ पार्टची चर्चा सुरु होती. अखेर येत्या वर्षी डिसेंबरमध्ये हा भाग प्रेक्षकांच्या (Viral News) भेटीला येणार आहे. अशात एक नवी बातमी समोर आली आहे.

पुष्पा २ द रुल नावाच्या चित्रपटामध्ये अल्लु अर्जुन हा प्रमुख भूमिकेत (Pushpa Latest News) असून त्यातील व्हिलनच्या भूमिकेत बॉलीवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचे नाव घेतले जात आहे.पुष्पाच्याबाबत बोलायचे झाल्यास या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर पाचशे कोटींपेक्षा जास्त कमाई करुन एक वेगळा विक्रम आपल्या नावावर केला होता.

' रिपोर्टसच्या माहितीनुसार, बॉलीवूडचा खलनायक हा आता पुष्पा २ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आज तकनं दिलेल्या माहितीनुसार, पुष्पाचे दिग्दर्शक सुकुमार यांनी संजय दत्तशी संपर्क साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी अशी एक बातमी समोर आली होती की, दिग्दर्शकानं व्हिलनच्या भूमिकेसाठी बॉलीवूडमधील एका बडया कलाकाराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

कसा असणार संजय दत्तचा रोल?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय दत्तचा पुष्पा २ मध्ये निगेटिव्ह रोल असणार आहे.असंही म्हटलं जात आहे की त्याची ती भूमिका चित्रपटातील सर्वात महत्वाची भूमिका ठरणार आहे. कथानकामध्ये आणखी एका प्लॉटचा समावेश करण्यात आला असून त्यात आता संजय पूर्ण चित्रपटात दिसणार नसून त्याचा एक मोठा कॅमिओ असणार आहे.

यापूर्वी देखील पुष्पाच्या बाबत वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयी हा पुष्पा २ मध्ये दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मनोजनं या सगळ्या अफवा असल्याचे बोलले होते. यशच्या केजीएफ २ मध्ये दमदार परफॉर्मन्स दिलेल्या संजय दत्तच्या नावाची आता जोरदार चर्चा होत आहे. अर्थात निर्मात्यांकडून अधिकृतपणे याविषयी कोणतीही बातमी समोर आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT