Pushpa Actor Jagdish Bandari Arrested esakal
मनोरंजन

Pushpa Actor Jagdish Bandari : पुष्पा फेम अभिनेत्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, काय आहे कारण?

पुष्पा चित्रपटातून प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या अभिनेत्याला आता पंजागट्टा पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Pushpa Actor Jagdish Bandari Arrested : पुष्पा चित्रपटातून प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरलेल्या अभिनेत्याला आता पंजागट्टा पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जगदीश प्रताप बंदरी असे अटक केलेल्या अभिनेत्याचे नाव आहे.

जगदीशनं पुष्पामध्ये अल्लु अर्जूनच्या मित्राची केशवची भूमिका केली होती. त्या भूमिकेनं त्याला अमाप लोकप्रियता मिळाली. मात्र एका घटनेमुळे अभिनेता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. जगदीशनं एका व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

३० वर्षीय जगदीश हा एका ज्युनिअर आर्टिस्टसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्या महिलेनं २९ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्या कुटूंबीयांनी जगदीशच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार केली. त्यात त्यांनी तोच मुलीच्या आत्महत्येसाठी जबाबदार असल्याचे म्हटले होते. पोलिसांनी जगदीशकडे तपास केल्यानंतर त्याला कलम ३०६ अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

जगदीशच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झाल्यास तो बऱ्याचदा मायथ्री मुव्ही मेकर्सच्या कमी बजेटच्या चित्रपटांमध्ये दिसून आला आहे. त्यात त्याच्या सत्थी गनी रेंदू येकारलू या चित्रपटाचे नाव घेता येईल. यानंतर तो नितीन आणि श्रीलीला यांच्या एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन आणि अंबाजीपेटा मॅरेज बँड नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT