Pushpa bug bites New York Mayor Eric Adams, watch him perform Allu Arjun's iconic step sakal
मनोरंजन

Viral Video: झुकेगा नहीं साला.. 'पुष्पा' स्टाइलवर थिरकले न्यूयॉर्कचे महापौर

'पुष्पा'चं वारं परदेशातही, व्हिडिओ होतोय व्हायरल..

सकाळ डिजिटल टीम

गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'पुष्पा : द राइज’ या चित्रपटाची जादू काय अजून गेली नाही. भारतातच नाही तर जगभरात देखील “झुकेगा नही साला” हा डायलॉगने प्रचंड वेड लावले आहे.(Pushpa bug bites New York Mayor Eric Adams, watch him perform Allu Arjun's iconic step)

अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ स्टाइलची भूरळ न्यूयॉर्कच्या महापौरांनादेखील पडली आहे. एका फॅन पेजवरून न्यूयॉर्कच्या महापौरांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ एका कार्यक्रमादरम्यानचा आहे. या व्हिडीओमध्ये न्यूयॉर्कचे महापौर इरिक आणखी दोघांसह अल्लू अर्जुनप्रमाणे “झुकेगा नही साला” ही पुष्पाची हुक स्टेप करताना दिसत आहेत. “’पुष्पा’ या भारतीय चित्रपटावर प्रेम दाखवल्याबद्दल न्यूयॉर्कच्या महापौरांचे मनापासून धन्यवाद”, असं शेअर करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ चित्रपटामुळे लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्याच्या नायिकेची भूमिका साकारलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाही प्रसिद्धीझोतात आली. आता ‘पुष्पा’ या चित्रपटाचा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे.

पुष्पा २’ चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरसह इतरही कलाकरांची वर्णी लागल्याचं बोलण्यात येत होतं. परंतु, चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही चुकीची माहिती असल्याचं सांगत स्पष्टीकरण दिलं होतं. आता चाहत्यांना ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack Farmer : इमानदार श्वानांची धाडसी कहाणी! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचे प्राण वाचले, कुत्र्यांनी हल्ला करताच बिबट्याने...

U19 IND vs PAK: वैभव सूर्यवंशीला स्वस्तात रोखण्यात पाकड्यांना यश; पण आयुषच्या प्रहाराने झाले बेजार; चौकार- षटकारांची बरसात

Latest Marathi News Live Update: आपण सारे महाराष्ट्राची विचार करणारे लोक- देवेंद्र फडणवीस

Hacking Tips : तुमच्या मोबाईल स्क्रीनवर 3 रंगीत ठिपके बघितलेत का? फोन हॅक झालाय का पाहायचं असेल तर 'हे' एकदा चेक कराच

मनपा निवडणुकीबाबतची सर्वात मोठी अपडेट समोर! राज्यातील २९ महापालिकेच्या निवडणुका एकाच टप्प्यात? आचारसंहिता होणार लागू

SCROLL FOR NEXT