Sonnalli Seygall Wedding Esakal
मनोरंजन

Sonnalli Seygall Wedding: 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री अडकली लग्न बंधणात! कोण आहे तिचा राजकुमार?

Vaishali Patil

Sonnaali Seygall wedding: बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सिझन सुरु आहे. यात आता 'प्यार का पंचनामा' फेम अभिनेत्री सोनाली सेगल हिच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे.

रिपोर्ट्सनुसार, सोनाली तिचा प्रियकर आशिष सजनानीसोबत आज लग्न बंधणार अडकली आहे. सोनाली आणि आशिष गेल्या ५-६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र त्यांनी त्याच्या नात्यावर अधिकृतपणे काही बोलले नाहीत.

हिंदुस्तान टाईम्सच्या दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली बऱ्याच दिवसांपासून आशिषला डेट करत आहे. आशिष हा बिझनेसमन असून त्याचे बरेच हॉटेल्स आहेत. बराच काळ डेट केल्यानंतर दोघांनी त्याच्या नात्याला नावं देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. 7 जून 2023 म्हणजे आजच त्यांनी लग्न केले.

5 जूनपासूनच दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. सोमवारी मेहंदीचा कार्यक्रम होता.

दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर आले आहेत. या खास प्रसंगी सोनालीने गुलाबी आणि सिल्व्हर रंगाची साडी परिधान केली होती. चांदी आणि डायमंडच्या दागिन्यांनी तिने लूक पुर्ण केला होता.  यासोबत सोनालीने डोक्यावर दुपट्टाही नेला होता. ज्यामध्ये ती राणीपेक्षा कमी दिसत नव्हती. 

सोनालीच्या लग्नाला अनेक बॉलिवूड स्टार्सनीही हजेरी लावली होती, ज्यामध्ये कार्तिक आर्यन, मंदिरा बेदी आणि चाहत खन्ना दिसले होते. 

"ते जवळपास चार-पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनाही त्यांच्या अफेअरची चर्चा होऊ नये असे वाटत असल्याने त्यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले आहे.

सोनालीने नेहमीच तिचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिने तिच्या कामावर लक्ष केंद्रित करावे अशी तिची इच्छा आहे.

एकत्र हँग आउट करूनही, ते सोशल मीडियावर एकाच फ्रेममध्ये राहण्याचे टाळण्याचा प्रयत्न करतात. त्याच्या जवळच्या मित्रांनाही तसा आदेश मिळाला आहे. असाही दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

सोनालीने 2011 मध्ये 'प्यार का पंचनामा' मधून तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट लव रंजन यांनी दिग्दर्शित केला होता. यानंतर सोनाली 'प्यार का पंचनामा 2' मध्येही दिसली होती. अभिनेत्रीने 'वेडिंग पुलाव'मध्येही काम केले होते. सोनाली काही काळापूर्वी सलमान खानसोबत थम्स अपच्या जाहिरातीतही दिसली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT