टप्पू आणि जेठालाल  टप्पू आणि जेठालाल
मनोरंजन

बबितामुळे टप्पू आणि जेठालाल यांच्यात भांडण! काय आहे सत्य

सकाळ डिजिटल टीम

तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील बबिता कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे तर तर कधी डान्समुळे. तशीही ती सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असते. आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. बबितामुळे टप्पू आणि जेठालाल यांच्यात भांडण झाल्याचे समजते. आत हे किती खरं आहे, हेच पाहणे बाकी आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आणि त्यांच्या मुलाची भूमिका साकारणारे राज उनाडकट म्हणजेच टप्पू यांच्यात काही मतभेद झाले आहेत. त्यामुळे या दोन कलाकारांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे. यामुळे दोन्ही कलाकारांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रत्येक पात्राचे स्वतःचे महत्त्व आहे. ज्यामुळे त्यांना खूप पसंत केले जाते. गेल्या १३ वर्षांपासून ही मालिका सुरू आहे. ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जेठालाल आणि टप्पू यांच्यात वाद झाल्याचे सर्वजण बोलत आहेत. दोघांमधील मतभेदाला बबिता म्हणजे मुनमुन दत्ता जबाबदार असल्याचे लोक सोशल मीडियावर बोलत आहे.

सोशल मीडियावर दोघांचीच चर्चा

बबितामुळे जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी यांची शोच्या सेटवर टप्पू म्हणजेच राज उनाडकटशी भांडण झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरू लागल्याने विविध चर्चा सुरू झाली आहे. यामुळेच सोशल मीडियावर प्रत्येकजण त्यांच्याबद्दलच बोलत असल्याचे दिसत आहे.

दिलीप जोशी म्हणाले...

आमच्याबद्दल सुरू असलेली चर्चा केवल अफवा आहे. मालिकेतील सर्व कलाकार हे कुटुंबासारखे राहतात. आम्ही नेहमीच एकत्र असतो. त्यामुळे आमच्यात वादाचा प्रश्न उद्भवतच नाही, असे दिलीप जोशी यांनी दोघांमधील मतभेदाबद्दल मत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs PAK : वेस्ट इंडिजच्या स्टार खेळाडूने पाकिस्तानविरुद्ध कसोटी खेळण्यास दिला नकार! प्रशिक्षक डॅरेन सॅमीने सर्व काही खरं सांगितलं

Talathi Bharti 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

रामाच्या भूमिकेसाठी रणबीरने केला योग, ध्यान आणि धर्मग्रंथाचा अभ्यास; रामायणासाठी जाणून घेतलं प्रभू श्रीरामांचं तत्वज्ञान

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलीस चौकीसमोरच गोळीबार, तीन राऊंड फायर, एक जण जखमी

अलोक नाथ यांच्यावर अभिनेत्रीने केलेले अत्याचाराचे आरोप; स्वत:चा अनुभव सांगत नारायणी शास्त्री म्हणाली, 'त्यांनी कधी आमच्यासोबत...'

SCROLL FOR NEXT