R Madhavan On Oscar 2023-Says,'Rocketry and kashmir files also considered for oscar nominations' Google
मनोरंजन

R Madhavan: 'आता खूप झालं...', 'छेलो शो' च्या ऑस्कर एन्ट्रीनंतर माधवनचं मोठं विधान

भारताकडून ऑस्करसाठी गुजराती सिनेमा 'छेलो शो' ला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर मात्र सिने-इंडस्ट्रीतून नाराजीचा सुर उमटू लागला.

प्रणाली मोरे

R Madhavan On Oscar 2023: सध्या ऑस्कर २०२३ विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. याची घोषणा १२ मार्च २०२३ रोजी होणार आहे,ज्यासाठी सिनेमांच्या अधिकृत एन्ट्री प्रत्येक देशाकडून पाठवण्यात आल्या आहेत. भारताकडून ऑस्करसाठी गुजराती सिनेमा 'छेलो शो' ला पाठवण्यात आलं आहे, ज्यानंतर एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' आणि विवेक अग्निहोत्री यांच्या 'काश्मिर फाईल्स' विषयी भलतीच चर्चा रंगली आहे.

या सगळ्या दरम्यान आता आर माधवन ने देखील बोलून दाखवलंय की त्याला त्याचा 'रॉकेट्री..' सिनेमा देखील पाठवायला हवा होता. अर्थात,ही गोष्ट त्याने खूप साध्या-सरळ भाषेत म्हणजे तो वादात पडणार नाही अशा भाषेत बोलून दाखवली आहे. पण विवेक अग्निहोत्री मात्र म्हणालेत त्यांना या गोष्टीनं काही फरक पडत नाही.

गुजराती सिनेमा 'छेलो शो' ची ऑस्करमध्ये अधिकृत एन्ट्री झाली आहे. आर माधवन आणि त्याचा सह-अभिनेता दर्शन कुमार यांनी मस्करीत म्हटलंय की,'' 'रॉकेट्री','द काश्मिर फाईल्स' वर देखील विचार व्हायला हवा होता''. आर माधवन म्हणाला,'मला वाटतं की 'रॉकेट्री' आणि 'द काश्मिर फाईल्स' ला देखील पाठवायला हवं होतं''.

यानंतर तो पुढे म्हणाला, ''दर्शन 'द काश्मिर फाईल्स'साठी एक अभियान सुरु करत आहे. आणि मी 'रॉकेट्री..' साठी मोहिम राबवणार आहे. हो,पण यानंतर लगेच माधवन म्हणाला,''नकोच,त्यांना शुभेच्छा. मला आशा आहे की ते जातील आणि जिंकून आले तर आम्हाला त्यांचा अभिमानच वाटेल. ही वेळ आहे की आपण जसा आपल्या देशाप्रती चांगला विचार करतो तसाच आपल्या फिल्म इंडस्ट्री विषयी करायला हवा''.

आर माधवन सध्या आपला आगामी सिनेमा 'धोखा-द राऊंड दी कॉर्नर' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यानं एका मुलाखतीत देशातील ऑस्करविषयीच्या समान वागणूकीवर भाष्य केलं. तो म्हणाला,''मला आशा वाटते की देशात ऑस्करविषयी आणखी विचारपूर्वक निर्णय घेतला जाईल. गोष्टी चांगल्या होतील. आता खूप झालं. आपण तिथे जाऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा''. माधवनच्या याच मुद्द्याला धरुन अपारशक्ति खुराना म्हणाला की, ''आपल्याला एका लीगल अॅवॉर्ड शो ची गरज आहे. तसा एक शो येतोय आणि याला क्रिटिक्स चॉइस सारखा अॅवॉर्ड शो बोललं जाऊ शकतं. माधवनच्या 'धोखा-द राऊंड दी कॉर्नर' सिनेमात अपारशक्ति देखील आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

Water Scarcity: पाणीटंचाईविरोधात जनआक्रोश! महाविकास आघाडीचा सिडको कार्यालयावर मोर्चा

FASTag KYC Process : 'फास्टॅग' अपडेट करणं आता झालं अधिकच सोपं; जाणून घ्या कसं?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींची संजय राऊत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT