r madhavan R Madhavan Wraps Up Shoot Schedule of Nayanthara and Siddharth Starrer Esakal
मनोरंजन

R Madhavan Test: गुड न्यूज! आर. माधवनचा नवीन सिनेमा, 'टेस्ट' चित्रपटाच्या शूटिंगचे पॅकअप ..

Vaishali Patil

बॉलिवूड अभिनेता आर माधवन यांच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटानंतर आर माधवनला त्याच्या पुढच्या चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

लवकरच प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपणार आहे कारण माधवनने त्याच्या बहुप्रतिक्षित 'टेस्ट' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

अभिनेता आर माधव आणि दिग्दर्शक शशिकांत यांचा पोर्ट्स ड्रामा 'टेस्ट' या त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग नुकतंच संपल आहे. आर माधवन याने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्याचं समजतंय.

अष्टपैलू अभिनेता आणि अभिनयाची अनोखी शैली असलेला अभिनेता यात अतिशय मनोरंजक पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचं आणि मोशन पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये या चित्रपटाची चर्चा सुरू आहे.

" टेस्ट " हा चित्रपट क्रिकेट टेस्ट मॅच वर आधारित चित्रपट आहे, तो क्रीडाप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे. आर माधवन आणि सिद्धार्थ या चित्रपटासाठी 17 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले असून नयनताराच्या या चित्रपटामध्ये असल्याने या चित्रपटाला चार चाँद लागणार आहेत.

या पॅन-इंडिया स्पोर्ट्स ड्रामामध्ये नयनतारा आणि सिद्धार्थ देखील प्रमुख भूमिकेत असल्याचं कळतंय. " टेस्ट " साठी सगळे चाहते पुन्हा एकदा उत्सुक झाले आहेत.

माधवनला 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या भारतीय चरित्रात्मक चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक श्रेणीमध्ये आयफा पुरस्कारही जिंकला आहे. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती माधवन यांनीच केली होती. तसेच, त्याने स्वतः या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

आर माधवन लवकरच अजय देवगण आणि ज्योतिका यांच्यासोबत एका सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे, ज्याचं टायटल अद्याप जाहीर झालेले नाही. अजय आणि माधवन पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यासाठीही चाहते उत्सूक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT