Gaurav Malak Sakal: Sakal Unplugged wih Radha Khude 
मनोरंजन

Radha Khude Singer : गौतमीसाठी 'कचकच कांदा', 'पाहुणं जेवला काय'? म्हणणाऱ्या राधा खुडेच्या मनात आहे तरी काय?

पुण्याच्या वालचंद नगर भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील राधा तिच्या आवाजाने सध्या चर्चेत आहे.

युगंधर ताजणे

Gaurav Malak Sakal: Sakal Unplugged wih Radha Khude : पुण्याच्या वालचंद नगर भागातील मध्यमवर्गीय कुटुंबातील राधा तिच्या आवाजाने सध्या चर्चेत आहे. प्रतिकूल परिस्थितीत मात करत तिने आपल्या आवाजाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.' सुर नवा ध्यास नवा ' या कार्यक्रमाच्या निमित्ताने राधा महाराष्ट्रात पुढे आले. ती या कार्यक्रमात उपविजेती ठरल्यानंतर मागे वळून न पाहता तिनं गायन क्षेत्रात काम सुरू ठेवलं.

पाटलांचा बैलगाडा, पाहूनं जेवला काय ? ही तिने गायलेली गाणी प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर (Radha Khude Latest News) घेतली. इतकच नाही तर गौतमी पाटील सुद्धा तिच्या या गाण्यांमुळे राज्यभरात धुमाकूळ घालत आहे. मात्र इथपर्यंतचा राधाचा प्रवास सोप्पा नव्हता. तिचे बालपण , संगीत क्षेत्रातला तिचा प्रवास, लव स्टोरी या सगळ्या बाबत तिने सकाळच्या अनप्लग (Sakal Unplugged Podcast) पॉडकास्ट मध्ये सविस्तर गप्पा मारल्या आहेत. राधाच्या इथपर्यंतच्या प्रवासाबरोबरच तिची लव स्टोरी सुद्धा तितकीच विशेष आहे.

संगीतकार, कवी गोविंद तरडे यांच्यासोबत काम करत असताना गोविंद तरडे गाणं लिहितात आणि राधा आपल्या आवाजाने ते शब्द बोलके करण्याचं काम करते. हेच संगीत प्रेमात उतरलं आणि प्रेम झालं. त्यानंतर आम्ही लग्न केलं, आमचा सुखाचा संसार सुरू असल्याचं राधाने सांगितलं आहे. याबरोबरच इथपर्यंतच्या टप्प्यावर तिला आलेले अनेक अनुभव, तिने सांगितलेला एक प्रसंग खूप काही सांगून जाणारा आहे. ही संपूर्ण मुलाखत ऐकण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर लगेचच क्लिक करा.

आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या गायकीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या राधा खुडेचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. इंस्टावर राधाच्या फोटोंना नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसते. अल्पावधीत स्वताच्या नावाची वेगळी ओळख राधानं तयार केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT