Salman khan  team esakal
मनोरंजन

Radhe Movie: पायरेडेट कॉपी विकणा-या तिघांविरोधात गुन्हा दाखल

सलमाननंही सोशल मीडियावर याबाबत अधिकृतपणे माहिती दिली होती.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा भाईजान सलमान खानचा राधे युवर मोस्ट वाँटेड भाईजान नावाचा चित्रपट प्रदर्शित गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. अपेक्षेप्रमाणे त्याला चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादही मिळाला. आता सलमानचा हा चित्रपट एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे सलमानच्या या चित्रपटाची सोशल मीडियावर काहींनी पायरसी करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सलमाननंही सोशल मीडियावर याबाबत अधिकृतपणे माहिती दिली होती. त्यानं सांगितलं होतं की, माझ्या चित्रपटाची कुणी पायरसी करेल त्याला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. गेल्या काही दिवसांपासून पायरसीच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. साधारण दोन ते तीन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दृष्यम 2 चित्रपटावरुनही असाच वाद रंगला होता. या मुव्ही डाऊनलोड करण्याची लिंक व्हायरल झाली होती. त्यानंतर कोरोनानच्या काळात राधे च्या बाबत असाच प्रकार झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या राधेच्या पायरसी करणा-या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन जणांनी राधे चित्रपटाची पायरसी कॉपी सोशल मीडियावर व्हायरल केली असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. इंडिया टूडेच्या एका रिपोर्टनुसार, आतापर्यत या संशयित आरोपींची काही ओळख पटलेली नाही. त्या तिघांमधील दोघेजण हे व्हाटसअप युझर्स आहेत. ती लिंक व्हायरल करुन डाऊनलोड करण्यासाठी प्रेक्षकांना आवाहन केले जात होते. त्यासाठी त्यांना काही ठराविक रक्कम द्यावी लागत होती.

सध्या राधे चित्रपटाची सोशल मीडियावर ड्युप्लिकेट लिंक व्हायरल होत आहे. पोलिसांनी संबंधितांवर कॉपीराईट अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे. त्या रिपोर्टनुसार, फेसबुकवर त्या युझर्सनं ती पायरेटेड कॉपी 50 रुपयांमध्ये विकण्याची ऑफर केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT