Radhika Apte News  esakal
मनोरंजन

Radhika Apte: तो सीन करण्यापूर्वी ती नेहमीच अभिनेत्यासोबत...

कमी वेळात (Bollywood Movies) लाईमलाईटमध्ये आलेल्या राधिकानं केलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या आहेत.

युगंधर ताजणे

Birthday Radhika Apte: आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलनं बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. कमी वेळात (Bollywood Movies) लाईमलाईटमध्ये आलेल्या राधिकानं केलेल्या भूमिका प्रेक्षकांना भावल्या आहेत. परचेड मधील तिची भूमिका, अंधाधून मध्ये दिसलेली राधिका याशिवाय (Bollywood Actress Radhika ) काही लघुपटांमधून राधिकानं प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडले आहे. करिअरच्या सुरुवातीला बोल्ड़ सीनमुळे व्हायरल झालेल्या राधिकाचा संघर्ष काही सोपा नव्हता. मात्र प्रेक्षक काय म्हणतात, टीकाकार काय टीका करतात यापेक्षा आपल्याला काय आवडते याचा विचार करणाऱ्या राधिकाचं वेगळेपण नेहमीच अधोरेखित झाले आहे.

राधिकाचा आज जन्मदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण तिच्याविषयीच्या काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. राधिकाची ओळख अनेकांना तिच्या बोल्ड सीनमुळे आहे. शोर इन द सिटीमध्ये तिनं केलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक केले होते. एका चित्रपटातील बोल्ड सीन व्हायरल झाल्यानं राधिका चर्चेत आली होती. याशिवाय ती नेहमीच तिच्या परखड वक्तव्यांबद्दलही ती चर्चेचा विषय राहिली आहे. राधिका जेव्हा एखाद्या चित्रपटामध्ये बोल्ड सीन देते तेव्हा त्याबाबत तिच्याविषयी एक गोष्ट नेहमीच सांगितली जाते.

सध्याच्या घडीला नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून राधिकाचे नाव घ्यावे लागेल. राधिकाचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी तामिळनाडूतील वेल्लोर येथे झाला. राधिका केवळ हिंदीच नाहीतर इंग्रजी, तमिळ, मराठी, बंगाली चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री आहे. त्यामुळे ती जगभर लोकप्रिय झालेली अभिनेत्री आहे. बोल्ड सीन करताना राधिका तो सीन अधिक प्रभावी व्हावा यासाठी सहकलाकाराशी मोकळेपणानं संवाद साधते. बऱ्याचदा तिनं त्या सीनसाठी रिहर्सल केल्याचेही सांगितले जाते.

चित्रपटातील तो प्रसंग प्रेक्षकांना कसा भावेल यासाठी आपण अधिक प्रयत्नशील असल्याचे राधिकानं काही मुलाखतींमधून सांगितलं आहे. आपल्या भूमिकांसाठी नेहमीच मेहनत घेणाऱ्या राधिकाच्या वाट्याला ज्या भूमिका आल्या त्याचं तिनं सोनं केलं आहे. असं म्हटलं जातं की, पार्श्चडमध्ये काम करताना तिनं एका बोल्ड सीनसाठी रिहर्सल केली होती. त्या चित्रपटामध्ये राधिका आपटे आणि आदिल हुसैन यांनी बोल्ड सीन दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT