Radhika Apte says she refused to work in some sex comedies because 'they objectified women'  sakal
मनोरंजन

Radhika apte: सेक्स कॉमेडी सिनेमे नाकारले, कारण बॉलीवुडमध्ये महिलांना.. राधिका आपटेने उडवली खळबळ

धक्कादायक विधान करत राधिकाने उघड केलं बॉलीवुडच सत्य..

सकाळ डिजिटल टीम

Radhika apte: राधिका आपटे इंडस्ट्रीत तिच्या बोल्डनेस आणि बोल्डनेसमुळे चर्चेत असते. तिच्या दमदार अभिनयासाठी आणि बोल्ड अभिनयासाठी ओळखली जाते. राधिकाने अनेक प्रकारच्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. राधिकाने 'बदलापूर' आणि 'हंटर' या चित्रपटांमध्ये सेक्स कॉमेडी भूमिका केल्या होत्या. नुकत्याच एका मुलाखतीत, राधिकाने खुलासा केला की या चित्रपटानंतर मला अशाच भूमिकांची ऑफर देण्यात आली होती, परंतु मी त्यांना नकार दिला.

(Radhika Apte says she refused to work in some sex comedies because 'they objectified women')

राधिकाने एका मुलाखतीत खुलासा केला की, '२०१५ मध्ये बदलापूर रिलीज झाला तिला. ज्यामध्ये तिने अभिनेता विनय पाठकच्या पत्नीची भूमिका साकारली होती आणि हा चित्रपट मोठ्या पडद्यावर हिट ठरला होता. चित्रपटाचे यश आणि राधिकाच्या पात्राची लोकप्रियता पाहून निर्मात्यांनी राधिकासाठी सेक्स कॉमेडी चित्रपटाच्या अनेक भूमिका आणल्या. मात्र राधिकाने ऑफर्स नाकारल्या. या निर्णयामागचे कारण स्पष्ट करताना राधिका म्हणाली की, माझी ओळख बोल्ड अभिनयासाठी असली तरी मला सेक्स कॉमेडी करण्यात रस नाही. कारण या प्रकारात महिलांना काहीही भूमिका देतात आणि त्यामुळे दर्जा कमी होतो.

राधिकाने (radhika apte) एका मुलाखतीत खुलासा केला "मला वाटते की बदलापूरनंतर मला काही सेक्स कॉमेडी ऑफर करण्यात आल्या होत्या. मला सेक्स कॉमेडी करायला हरकत नाही. हंटर हा चित्रपट देखील एक सेक्स कॉमेडी होता पण, बॉलीवूडमध्ये आपल्याकडे अशा प्रकारचे सेक्स कॉमेडी चित्रपट आहेत ज्यामध्ये महिला कलाकारांची अवहेलना दाखवण्यात आली आहे. खर सांगायच तर बॉलीवूडमध्ये सेक्स कॉमेडीच्या नावाखाली महिलांची विक्री होते त्यामुळे अशी कॉमेडी मला आवडत नाही.''

राधिकाने असेही सांगितले की, जेव्हा माझ्यासमोर या सेक्स कॉमेडी संबंधित स्क्रिप्ट येतात तेव्हाच मला समजते की हा चित्रपट काय आहे आणि कोणत्या प्रकारचे विनोद केले आहेत. त्यामुळे मी अशा गोष्टींना थेट नकार देते.' तिच्या या मुलाखतीने खळबळ उडवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female Doctor Case: पीएसआय आणि अन्य आरोपीनं महिला डॉक्टरचा छळ का केला? पीडितेच्या भावानं खरं कारणच सांगितलं, वाचा इनसाईड स्टोरी...

BEL Recruitment 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअर पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज करण्याची अंतिम तारीख

Satara Female Doctor Case : साताऱ्यातील डॉक्टर तरुणीच्या प्रकरणात वांरवार फोन करणारा खासदाराचा पीए कोण? कुटुंबियांचे गंभीर आरोप

Guru Transit 2025: गुरु उच्च राशीत कर्क राशीत प्रवेश; 'या' राशींचे नशीब उजळणार, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

Pachod News : अतिवृष्टीग्रस्त शाहन्नव हजार शेतकऱ्यांची दिवाळी संपली, मदतीच्या प्रतिक्षेत....!

SCROLL FOR NEXT