Radhika Merchant Emotional  esakal
मनोरंजन

Radhika Merchant Emotional : 'देखा तेनु पहली पहली बार वे...' अनंतला पाहताच राधिकाच्या डोळ्यात पाणी! वऱ्हाडी मंडळीही भावूक

राधिकानं (Radhika Merchant Emotional ) त्या गाण्यावर केलेला डान्स हा उपस्थित वऱ्हाडी मंडळींना भावूक करुन केला.

युगंधर ताजणे

Anant Ambani And Radhika Merchant Pre Wedding : अनंत अन् राधिकाच्या प्री वेडिंगनं केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक सेलिब्रेटींचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले. तीन दिवस सुरु असणाऱ्या प्री वेडिंगला वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी हजर होते. त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या सगळ्यात आता राधिकाच्या एका व्हिडिओनं प्री वेडिंगमधील पाहुणे मंडळी भावूक झाल्याचे दिसून आले आहे.

प्री वेडिंगमध्ये रिहानाचा परफॉर्मन्स हा चर्चेचा विषय होता. तिनं पहिल्यांदाच भारतामध्ये परफॉर्मन्स देत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी रिहानानं बॉलीवूडमधील सेलिब्रेटींसोबत केलेलं फोटोशुटही प्रतिक्रियाचा विषय होता. आमिर, सलमान आणि शाहरुखचा नाटू नाटू गाण्यावरील डान्स हा या प्री वेडिंगची शोभा वाढवणारा होता. मात्र राधिकाच्या त्या व्हिडिओनं चाहत्यांना जिंकून घेतलं आहे. इंस्टट बॉलीवूडनं तो व्हिडिओ शेयर केला आहे.

अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचेही सादरीकरण झाले. मुकेश अंबानी यांचा डॉन चित्रपटातील गाण्यावर झालेला खास परफॉर्मन्स कौतुकाचा विषय होता. तर नीता अंबानी यांचे नृत्य प्री वेडिंगमधला लक्षवेधी इव्हेंट होता. यावेळी राधिकानं देखील स्टेजवर एंट्री घेत सर्वांना चकित केलं.

राधिका आणि अनंतच्या त्या डान्सचे कौतुक होत आहे. तिनं कभी खुशी कभी गम चित्रपटातील तेनु देखा पहली पहली बार या गाण्यावर केलेलं सादरीकरण कौतुकाचा विषय आहे. यावेळी तिच्या सादरीकरणानं वऱ्हाडीमंडळीही भावूक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर अनंतही त्याच्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. या दोघांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खास चर्चेचा विषय आहे.

१ ते २ मार्च दरम्यान गुजरात मधील जामनगरमध्ये अनंत अन् राधिकाचा प्री वेडिंग सोहळा रंगला. याला जगभरातील उद्योग, अर्थ, माहिती तंत्रज्ञान, मनोरंजन, राजकारण, क्षेत्रातील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली होती. बिल गेट्स पासून ते डीजे ब्राव्होपर्यत अनेक मान्यवरांचा सहभाग होता.

यापूर्वी देखील तीन दिवसीय या प्री वेडिंग सोहळ्यातील बॉलीवूड सेलिब्रेटींचे परफॉर्मन्स चर्चेत आले होते. त्यात दीपिका पदुकोण ते जान्हवी कपूरच्या डान्सनं चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. हॉलीवूडमधील रिहाना, अकॉन यांची उपस्थिती आणि सादरीकरण हा खास उत्सुकतेचा विषय होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Rally Chaos : मिरजेत अजित पवारांच्या सभेत गोंधळ; उमेदवारावर तडीपारीच्या कारवाईने समर्थक संतापले

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

SCROLL FOR NEXT