raghav chaddha and parineeti chopra Sakal
मनोरंजन

Parineeti Chopra: राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा करणार लग्न? पुन्हा एकदा दिसले एकत्र, पाहा फोटो

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आमआदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांच्या लग्नाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. आज परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा सकाळी मुंबईत पोहोचले, त्यांच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान प्रियांका चोप्रा संपूर्ण कुटुंबासह मुंबईत आली आहे.

परिणीती आणि राघवला पुन्हा एकदा एकत्र पाहिल्यानंतर दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्याही समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा यांचा साखरपुडा होऊ शकतो. ज्यामध्ये प्रियांका चोप्रा आणि निक जोनास देखील सामील होणार आहेत.

बॉलिवूडमधून जागतिक अभिनेत्री बनलेली प्रियांका चोप्रा आपली मुलगी मालती हिला 31 मार्च रोजी पहिल्यांदा भारतात घेऊन आली आहे. प्रियांका आणि तिचा पती निक जोनास भारतात आल्यापासून, अशी अटकळ बांधली जात आहे की ती आपल्या कुटुंबासह फक्त तिची चुलत बहीण परिणीती चोप्राच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी देशात परतली आहे. आता परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा कधी लग्न करतात हे पाहावे लागेल.

'इशकजादे' चित्रपटातून अर्जुन कपूरसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी परिणीती चोप्रा लग्नाच्या बातम्यांदरम्यान बॉलिवूडचे प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा ​​यांच्या घराबाहेर अनेकदा स्पॉट झाली होती. त्यानंतर असे दिसते की परिणीती तिच्या लग्नाचा पोशाख मनीष मल्होत्राकडून डिझाईन करून घेत आहे.

कियारा अडवाणी आणि आलिया भट्ट यांनीही त्यांच्या लग्नात मनीष मल्होत्राने डिझाइन केलेले पोशाख परिधान केले होते. परिणीती तिच्या लग्नात साडी नेसते की लेहेंगा, हे येणाऱ्या काळातच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT