Raghav Chadha esakal
मनोरंजन

Raghav Chadha : 'तुम्ही फक्त...' परिणीतीच्या होणारा नवरा राघव पहिल्यांदाच बोलला!

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Raghav Chadha AAP MP Parineeti Chopra Reactions : बॉलीवूडची अभिनेत्री आणि आता हॉलीवूडमध्ये स्वताच्या नावाची वेगळी ओळख तयार केलेल्या प्रियंका चोप्राच्या बहिणीची परिणीतीची मोठी चर्चा रंगली आहे. तिचा साखरपुडा हा आपच्या खासदारासोबत राघव चढ्ढाशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बहिणही त्याच कार्यक्रमासाठी आल्याची चर्चा आहे.

परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. पहिल्यांदा या गोष्टी केवळ अफवा आहेत असे म्हणणाऱ्या परिणीतीला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत खोटं बोलून गोष्ट टाळू पाहणाऱ्या अभिनेत्रीवर टीका केली होती. आम्हालाही सगळे काही माहिती आहे, कॅमेरा खोटं बोलत नाही. अशा आशयाच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या होत्या. यासगळ्यात तिच्या होणाऱ्या पतीनं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

Also Read - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

राघव चढ्ढानं पहिल्यांदाच परिणीतीसोबतच्या रिलेशनशिपवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं लग्नावरही दिलेली प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. इंडिया टुडेशी राघव चढ्ढा यांनी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांना आप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष कसा आहे यावर त्यांनी मत व्यक्त केले. मात्र त्याचवेळी त्यांना त्यांच्या रिलेशनशिपविषयी विचारले असता त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी आहे.

राघव यांनी त्या प्रतिक्रियेतून तुम्ही आता सेलिब्रेशनची तयारी करा असे म्हटले आहे. येत्या काही दिवसांत तुम्हाला खूप गोष्टी कळणार आहेत. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना लग्नात नाचण्याची संधी मिळणार आहे. असे राघवनं त्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे. त्याच्या त्या प्रतिक्रियेवर चाहत्यांनी देखील त्याला वेगवेगळे प्रश्न विचारुन हैराण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT