Raghav Chadha Parineeti Chopra Husband Viral post esakal
मनोरंजन

Raghav Chadha Viral Post : 'परु तुच माझी रॉकस्टार, तू तर...' परिणीतीचं सिगिंग डेब्यू! राघव चढ्ढांच्या पोस्टनं वेधलं लक्ष!

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि स्टाईलमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Raghav Chadha Parineeti Chopra Husband Viral post : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि स्टाईलमुळे चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे.गेल्या वर्षी ती आप पक्षाचे खासदार राघव चढ्ढा सोबत विवाहबद्ध झाली. परिणीतीचं लग्न आणि त्या पोस्ट नेटकऱ्यांच्या, चाहत्यांच्या खास चर्चेचा विषय होता.

या सगळ्यात आता राघव चढ्ढा यांच्या त्या रोमँटिक पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यापूर्वीही राघव यांनी परिणीती संदर्भात पोस्ट शेयर केल्या आहेत. मात्र यावेळची पोस्ट खास असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. चढ्ढा यांच्या त्या पोस्टमध्ये परिणीती ही स्टेजवर गाणे गाताना दिसते. त्यात ती ब्लॅक आऊटफिट आणि गोल्डन ज्वेलरी परिधान केलेली दिसत असून त्यावर राघव यांना पोस्ट करण्याचा मोह आवरला नाही.

राघव यांनी परिणीतीला रॉकस्टार आणि बुलबूल असे म्हटले आहे. त्यांच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांना जिंकून घेतले आहे. परिणीतीनं मुंबई फेस्ट २०२४ मध्ये सिंगिंग डेब्यू केले होते. त्यानंतर राघव यांच्या त्या पोस्टनं नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. परिणीतीनं जेव्हा तिचा पहिला कॉन्सर्ट केला होता त्यावेळी तिला आलेलं दडपण दूर करण्यासाठी राघव चढ्ढा यांनी मदत केली होती.

राघव यांनी जी पोस्ट केली आहे त्यात म्हटले आहे की, तू रॉकस्टार आहेस. एका ट्रेंड क्लासिकल गायकासारखं तू गाते आहेस हे पाहून आनंद वाटला. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. अशा शब्दांत राघव चढ्ढा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही भन्नाट आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT