raghav juyal  Esakal
मनोरंजन

Raghav Juyal: 'किसी का भाई किसी की जान'च्या शूटिंगदरम्यान राघवला झाला होता डेंग्यू, मग पुढं असं काही झालं की...

राघव जुयाल हा उत्तम डान्सर असण्यासोबतच एक चांगला अभिनेता आहे.

Aishwarya Musale

राघव जुयाल हा उत्तम डान्सर असण्यासोबतच एक चांगला अभिनेता आहे. तो आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकतो. आता तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. दरम्यान, या चित्रपटाबद्दल बोलताना अभिनेत्याने खुलासा केला की, त्याला जेव्हा कास्ट केले होते, तेव्हा त्याला डेंग्यू झाला आणि डेंग्यू असूनही त्याने चित्रपटाचे शूटिंग केले.

राघव जुयालने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डेंग्यू झाल्याचा खुलासा केला. शूटिंग पूर्ण करण्यासाठी मर्यादित वेळ असूनही, मला प्रोडक्शन टीमला त्रास होऊ द्यायचा नव्हता. यानंतर मी चित्रपटाचे शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आणि सेटवर जाऊन शूट केले.

राघव जुयालने चित्रपटाच्या टीमचे कौतुक केले. तो म्हणाला, टीम माझ्या परिस्थितीबद्दल खूप समजूतदार आणि दयाळू होती. मी हे करू शकलो याचा मला आनंद आहे कारण मी ज्या टप्प्यातून जात होतो तो माझ्यासाठी आणि माझ्या पात्रासाठीही खूप वेगळा होता. प्रकृती अस्वास्थ्य असतानाही मी माझ्या टीमच्या मदतीने शूटिंग सुरू ठेवले.

राघव जुयाल सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. या चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबती, शहनाज गिल, भूमिका चावला, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, विजेंदर सिंग आणि पलक तिवारी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT