Rahul Gandhi Disqualified  esakal
मनोरंजन

Rahul Gandhi Disqualified : 'पप्पुला घाबरले, त्याच्यामुळेच...' स्वराची आगपाखड, मोदींवर मोठी प्रतिक्रिया

स्वराच्या लग्नाला राहुल गांधींनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Rahul Gandhi how scared they are of so called : अभिनेत्री स्वरा भास्कर ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांसाठी ओळखली जाते. आपण जे बोलू त्यावर ठाम राहत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तरं देण्यासाठी स्वरा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय असते. तिनं आता राहुल गांधी यांना ठोठावण्यात आलेली शिक्षा आणि त्यांची रद्द झालेली खासदारकी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

स्वराच्या लग्नाला राहुल गांधींनी हजेरी लावली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांची वेगळीच चर्चा होती. यापूर्वी देखील स्वरानं कित्येकदा राहुल गांधीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, भारत जोडो यात्रेचे फोटो व्हायरल केले होते. त्यावर प्रतिक्रिया दिली होती.

Also Read - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

यासगळ्यात राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर स्वरानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. स्वरानं दिलेल्या प्रतिक्रियेत असे म्हटले आहे की, ज्याला पप्पु म्हणून हिणवलं गेलं त्या पप्पुला आता सगळे घाबरले आहेत. त्यामुळेच की काय त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्या भारत जोडो यात्रेला जो भव्य प्रतिसाद मिळाला त्यातून त्याच्या लोकप्रियतेत झालेला वाढ अनेकांच्या पोटदुखीचे कारण झाली आहे.

आगामी २०२४ च्या निवडणूकांमध्ये राहुल गांधी दिसू नये याची काळजी घेतली गेली आहे. त्या स्पर्धेतून टक्कर देणारा स्पर्धकच बाजुला काढायचा अशी ही सगळी खेळी आहे. मला वाटतं राहुल गांधी यासगळ्या संघर्षातून लवकरच बाहेर येतील. अशी प्रतिक्रिया स्वरा भास्करनं दिली आहे.तिच्या प्रतिक्रियेवरुन तिला ट्रोल केले जात आहे.

राहुल गांधी यांनी सगळेच मोदी चोर कसे असू शकतात अशा आशयाची प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे. आता तर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्यानं अनेकांना मोठा धक्का बसला आहे. कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तर तीव्र शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT