rahul vaidya and disha parmar daughter naming ceremony  SAKAL
मनोरंजन

Rahul Vaidya - Disha Parmar: दोन महिन्यानंतर राहुल - दिशाने केलं मुलीचं बारसं, ठेवलं हे खास नाव

गायक राहुल वैद्य आणि अभिनेत्री दिशा परमार यांच्या लेकीचं बारसं झालंय

Devendra Jadhav

राहुल वैद्य आणि दिशा परमार हे मनोरंजन विश्वातील चर्चेतलं कपल. लव्हस्टोरी ते लग्नापासुन राहुल - दिशा कायमच चर्चेत राहिले.

सध्या राहुल - दिशा दोघेही त्यांच्या लाडक्या लेकीसोबतचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसुन येतात. नुकतंच राहुल - दिशाच्या मुलीचं बारसं झालंय. या दोघांनी मुलीचं नाव खास ठेवलंय.

(rahul vaidya and disha parmar daughter naming ceremony)

काय ठेवलं मुलीचं नाव?

30 सप्टेंबर 2023 रोजी राहुल - दिशा यांनी त्यांच्या आयुष्यात मुलीचे स्वागत केले. आता जवळपास दोन महिन्यानंतर राहुल - दिशा यांनी मुलीच्या बारश्याचा घाट घातला.

राहुल - दिशाने काल मोजके मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत मुलीचं बारसं केलं. या दोघांनी मुलीचं नाव ठेवलं नव्या.

काय आहे राहुल - दिशाच्या मुलीचा नावाचा अर्थ

राहुल आणि दिशाने त्यांच्या मुलीचे नाव 'नव्या' ठेवले आहे. नामकरण समारंभात या दोघांनी त्यांच्या मुलीला फुलांनी सजवलेल्या सुंदर टोपलीत ठेवलंय. नव्याला गुलाबी रंगाच्या फ्रॉकमध्ये सजवण्यात आले होते.

नव्याचा अर्थ काय? असा प्रश्न तुम्हाल पडला असेल तर आम्ही सांगतो.. नव्याचा अर्थ, एक सुंदर मुलगी जी सतत लोकांच्या कौतुकास पात्र असते.

सर्वांनी सोशल मीडियावर राहुल - दिशाचं अभिनंदन केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT