rahul vaidya says rubina dilaik and abhinav shukla are not enemies 
मनोरंजन

रुबिना- अभिनवसोबत वैर आहे का? राहुल वैद्य म्हणतो...

शर्वरी जोशी

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. आतापर्यंत या शोचं प्रत्येक पर्व गाजलं असून या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धकदेखील चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अलिकडेच या शोचं १४ वं पर्व पार पडलं. विशेष म्हणजे हे पर्व कोणत्याही टास्कमुळे गाजलं नसून यात सहभागी झालेल्या स्पर्धकांमधील वादामुळे सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे.  राहुल वैद्य, रुबिना दिलैक, अभिनव शुक्ला, निक्की तांबोळी,  जान कुमार सानू आणि राखी सावंत असे अनेक स्पर्धक त्यांच्यातील वादामुळे चर्चेत राहिले आहेत. यात रुबिना आणि अभिनवसोबत अनेकदा राहुल वैद्यचे खटके उडाले आहेत. त्यामुळेच अलिकडे झालेल्या एका मुलाखतीत त्याला याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, या पश्नांवर राहुलने दिलेलं उत्तर सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आलं आहे.

'बिग बॉस १४' मध्ये सहभागी झालेले राहुल वैद्य, रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला या तिघांमध्ये अनेकदा वादाची ठिणगी पडल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे बिग बॉसमधून बाहेर पडल्यावरदेखील तुमच्यातील वाद कायम आहे का असा प्रश्न राहुलला विचारण्यात आला होता. त्यावर राहुलने दिलेलं उत्तर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

"आम्ही सगळे कलाकार आहोत. त्यामुळे कोणतंही काम करण्यास आम्ही कधीच नाही म्हणत नाही. काम करत असताना कधीही मतभेद किंवा अहंकार मध्ये आणता कामा नये. त्यावेळी आम्ही सगळे जण एका कार्यक्रमाचा भाग होतो आणि त्यावेळी जे झालं ते तिथेच संपलं आहे. शो संपल्यानंतर सारं चित्र बदललं आहे. रुबिना -अभिनव या शोनंतरही असेच आनंदात रहावेत हिच माझी इच्छा आहे. त्याचं नातं अधिक दृढ व्हावं असंच मनापासून वाटतं, " असं राहुल म्हणाला.

पुढे तो म्हणतो,  "ते दोघं वेगळे होणार असल्याचं त्यांनी या कार्यक्रमात सांगितलं होतं. मात्र, ते विभक्त होऊ नयेत अशीच माझी कायम इच्छा असेल. अनेकदा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर काही जण त्याच विचारात असतात. मात्र, माझं तसं अजिबात नाहीये.  आमच्या काही खानदानी वैर नाही. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जे काही झालं ते काही आम्ही कायमस्वरुपी मनात ठेवून चालणार नाही."

दरम्यान, अभिनेत्री रुबिना दिलैक ही 'बिग बॉस १४'ची विजेती ठरली असून राहुल वैद्य फर्स्ट रनर- अप ठरला आहे. मात्र, या शोमध्ये रुबिना आणि राहुलमध्ये अनेक मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा त्यांचे वाद विकोपालादेखील गेले होते.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये पेट्रोल तब्बल 10 रुपये स्वस्त! तुमच्या शहरात आजचा दर किती?

Kagal Politics : हसन मुश्रीफ आणि घाटगे एकत्र कसे आले? CM फडणवीसांच्या कागल दौऱ्यापूर्वीच समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्टच सांगितली पडद्यामागची कहाणी

Bhandardara Accident: भंडारदरा पर्यटनाला गालबोट! मद्यपींची हुल्लडबाजी, भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Buldhana Farmer Loan Waiver: बुलडाण्यात १.१६ लाख पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, ६७ हजार ई केवायसी प्रलंबित

SCROLL FOR NEXT