raj and kaveri engagement ceremony on Bhagya Dile Tu Mala serial colors marathi sakal
मनोरंजन

Bhagya Dile Tu Mala: अखेर राज परीक्षेत पास! राज-कावेरीचा साखरपुडा दणक्यात..

कलर्स मराठी वरील ''भाग्य दिले तु मला'' ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहे.

नीलेश अडसूळ

Bhagya Dile Tu Mala: गेल्या काही आठवड्यांपासून 'भाग्य दिले तू मला' या मालिकेची प्रेक्षकांमध्ये प्रचंड चर्चा आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. मालिकेचं कथानक आणि मालिकेचे कलाकार दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यामुळेच काहीच महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करू लागली. त्यातही राज आणि कावेरी यांची जोडीही प्रेक्षकांची अत्यंत आवडती झाली. ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.

(raj and kaveri engagement ceremony on Bhagya Dile Tu Mala serial colors marathi)

राजने आपल्या प्रेमासाठी दिलेले सर्व आव्हाने पार केली आहेत. राजसमोर खूप मोठे आव्हान तात्यांनी त्याला दिले होते. तात्यांनी राजला चॅलेंज दिले होते की या गावात राहून दाखव कमवून दाखव... आणि ते राजने स्वीकारले देखील आहे.मालिकेमध्ये राज विटांच्या भट्टीवर राबताना दिसला, शेतकाम तसेच टेम्पो ड्रायव्हर चे काम करताना दिसला, इतकेच नव्हेतर तात्यांच्या टपरीवर धुणे भांडीचे काम देखील केले. अखेर राज आणि कावेरी सर्व संकटांवर मात करत अखेर एकमेकांच्या जवळ आले..

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

raj and kaveri engagement ceremony on Bhagya Dile Tu Mala serial colors marathi

आता राज आणि कावेरीचा त्यांच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. राज आणि कावेरीचा साखरपुडा होणार आहे आणि वाढणार आहे दोघांच्या नात्यांतील प्रेमाचा गोडवा. कावेरी आणि राजचा साखरपुडा सोहळ्याचे फोटो आता समोर आले आहेत. यामध्ये राज आणि कावेरी पारंपरिक अंदाजात दिसून येत आहेत.कावेरीने आपल्या साखरपुड्यासाठी सुंदर अशी काठपदराची हिरवीगार साडी नेसली आहे.तर दुसरीकडे राजनेसुद्धा खास असा कुर्ता-पायजमा परिधान केला आहे.राज आणि कावेरी या फोटोमध्ये रोमँटिक पोझ देताना दिसून येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT