raj kaveri wedding special ukhana Bhagya Dile Tu Mala serial colors marathi sakal
मनोरंजन

Bhagya Dile Tu Mala: लग्न झालं आणि राज-कावेरीनं घेतला फर्मास उखाणा.. असा की तुम्हीही..

राज-कावेरीचा लग्नसोहळा पडला पार आणि उखाण्याची झाली चर्चा..

नीलेश अडसूळ

Raj kaveri wedding: सध्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तु मला' ही मालिका बरीच चर्चेत आहे. कारण ज्या क्षणाची सारेजण आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आता जवळ आला आहे, म्हणजे आज आणि कावेरी विवाह बंधनात अडकणार आहे. नुकतेच या विशेष भागाचे चित्रीकरण पार पडले. यावेळी राज आणि कावेरीने एक फर्मास उखाणा घेतला, ज्याची आता जोरदार चर्चा होत आहे.

ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहिली होती. अखेर त्यांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले, याचे प्रक्षेपण 26 फेब्रुवारीच्या विशेष भागात होणार आहे.

एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.

कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे.

राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे. दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.

नुकतेच या भागाचे चित्रीकरण झाले, यावेळी कावेरी आणि राज यांनी एकमेकांसाठी भन्नाट उखाणे घेतले. कावेरी म्हणते, 'कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून.. राजवर्धन रावांचे नाव घ्याची सुरुवात होतेय आजपासून'

तर राज मात्र एकदम विनोदी उखाणा घेतो, राज म्हणतो, 'लग्नासाठी स्थळ पाहताना आई तुझ्यावरच अडली, नशीब माझं फुटकं की कावेरी गळ्यात पडली..' राजचा हा उखाणा ऐकून सर्वांनाच हसू आलं.

त्यावर कावेरी म्हणते असा उखाणा घेतला तर मी आताच घटस्फोट घेते. पण पुढे राज म्हणतो, ' काही शब्द येतात ओठातून.. कावेरीचं नाव येतं हृदयातून.. ' असा उखाणा त्या दोघांनी एकमेकांसाठी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT