ram kadam and raj kundra  
मनोरंजन

'राजकडून शिल्पाच्या चेहऱ्याचा वापर' भाजप नेते राम कदम यांचा आरोप

उद्योगपती राज कुंद्राची (raj kundra) डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही.

युगंधर ताजणे

मुंबई - उद्योगपती राज कुंद्राची (raj kundra) डोकेदुखी काही कमी होण्याचे नाव घ्यायला तयार नाही. पॉर्न व्हिडिओ (porn video) तयार करणे आणि ते एका अॅपच्या माध्यमातून शेयर करणे याप्रकरणी त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. आता सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या सगळ्या प्रकरणावर अनेकांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. यापूर्वी अभिनेत्री शर्लिन चोप्रा, पुनम पांडे यांनी राजवर व्हिडिओमध्ये काम करण्याची ऑफर दिली होती. आता भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी देखील राजवर एक गंभीर आरोप केला आहे. कदम यांच्या त्या वक्तव्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (raj kundra case bjp leader ram kadam accuses him for game gambling know details yst88)

राज 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणाचा अद्याप तपास सुरु आहे. असे असताना त्याबाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येताना दिसत आहे. राजनं फसवणूक आणि शाररिक शोषण केल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. त्यानं फसवणूक करुन पैसे कमावले असे कदम यांनी म्हटले आहे. कदम यांचे म्हणणे आहे की, राजनं त्या व्हिडिओच्या वितरणाच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केली आहे. कित्येक गरिबांना त्यानं लुटलं आहे. यासगळ्या प्रकारात त्यानं आपली पत्नी शिल्पा शेट्टीच्या फेमचा उपयोग करुन घेतला आहे.

ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करणाऱ्या राजनं लोकांचा विश्वासघातही केला आहे. ज्या अभिनेत्रीचं त्यानं शारिरीक शोषण केलं त्या अभिनेत्रीनं जेव्हा पोलीसांमध्ये तक्रार करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिच्यावर दबाब आणण्याचा प्रयत्नही त्यानं केला होता. आम्हाला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा आदर आहे. मात्र राजनं ऑनलाईन गेम्सच्या प्रचारकामी शिल्पा शेट्टी यांच्या फेमचा दुरुपयोग केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिल्पा यांची देखील बदनामी झाली आहे.

राज यांची वियान नावाची इंडस्ट्री आहे. त्यांचा तो ऑनलाईन गेम आहे. त्याचा गेम ऑफ डॉट्स नावाचा एक गेम आहे. ज्याच्याविषयी लोकांना असे सांगण्यात आले होते की हा ऑनलाईन गेम आहे. आणि तो पूर्णपणे वैध आहे. आता त्या कंपनीच्या लेटर हेडवर शिल्पा शेट्टीचा फोटोही आहे. त्यात प्रमोशनसाठी राजनं तिच्या चेहऱ्याचा वापर केला आहे. यात असे सांगण्यात आले आहे की, हा गेम सरकारमान्य आहे. असेही राम कदम यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: NSE IPO लिस्टिंगआधीच शेअर बाजार कोसळला! Sensex 634 अंकानी घसरला; कोणते शेअर्स तोट्यात? NSE IPOचं काय झालं?

‘फक्त टी-शर्ट घालून…’ तुकाराम मुंढेंचा सेलिब्रिटींच्या समर्थनावर सवाल, प्रीती झिंटा-मल्लिकाचा उल्लेख करत म्हणाले

Asian Games 2026: "गोल्ड मिस हो गया"; ३.८८ सेकंदाने सुवर्ण हुकले, ढसाढसा रडला सतनाम; रोशिबिना देवीचे सलग तिसरे पदक

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

India New Zealand Tour : कसोटीच्या तयारीसाठी वनडेतून विश्रांती? ; न्यूझीलंड दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे संकेत

SCROLL FOR NEXT