Raj Kundra reveal truth of his post Esakal
मनोरंजन

Raj Kundra: 'अखेर शिल्पाचा पती कोणापासून वेगळा झालाय?' राजने पोस्ट करुन स्वतःच केला खुलासा...

Raj Kundra reveal truth of his post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहे.

Vaishali Patil

Raj Kundra reveal truth of his post: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही नेहमी चर्चेत असते. मग ते तिच्या फिटनेसमुळे असो किंवा तिच्या व्हिडिओमुळे. मात्र सध्या शिल्पापेक्षा तिचा पती राज कुंद्रा जास्त चर्चेत आहे. राज कुंद्राचा UT 69 हा चित्रपट काही दिवसात रिलिज होणार आहे.

राज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. त्यातच काल राजने एक पोस्ट शेयर केली ज्यानंतर त्याच्यात आणि शिल्पात काही मतभेद झाले आहेत का आणि राज तिला घटस्फोट देणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले होते.

राज कुंद्राने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती आणि यात लिहिले होते की ,'आम्ही वेगळे होत आहोत आणि मी तुम्हाला विनंती करतो की या कठीण काळात आम्हाला एकटं सोडा.'

या ट्विटनंतर सोशल मिडियावर फक्त राजचीच चर्चा होती तर शिल्पानं या पोस्टवर काही कमेंट केली नव्हती. काही नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. राज केवळ 'पब्लिसिटी स्टंट' करत आहे असंही अनेकांनी म्हटले होते.

आता राजची ही पोस्ट शिल्पा किंवा त्याच्या नात्याबद्दल नव्हे तर ही पोस्ट होती त्याच्या मास्कबद्दल. राजने त्यांच्या मास्कसाठी ही पोस्ट केली होती. आता पुन्हा राज कुंद्राने त्याच्या एक्सवर पोस्ट शेयर केली आहे. यात त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राज वेगवेगळ्या मास्कमध्ये दिसत आहे.

यापोस्टमध्ये राजने लिहिले की, 'फेअरवेल मास्क... 2 वर्षांपासून माझे रक्षण केल्याबद्दल धन्यवाद, आता वेगळे होण्याची वेळ आली आहे.' त्याच्या यापोस्टवर आता नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर राजने घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम देत शिल्पासोबतचा एक व्हिडिओ शेयर केला आहे.

UT 69 या चित्रपटामुळे चर्चेत असलेला राज कुंद्राचा हा बायोपिक आहे. या चित्रपटात त्याने आर्थर रोड तुरुंगात घालवलेल्या दिवसांची स्टोरी सांगितली आहे. राजला जुलै 2021 मध्ये पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली होती. दोन महिने राज तुरुंगात राहिला होता. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाला असून चाहते या सिनेमासाठी उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT