Raj Kundra Google
मनोरंजन

शिल्पासोबत सिनेमा पहायला गेलेल्या राज कुंद्रावर आली तोंड लपवण्याची वेळ

अश्लील फिल्म निर्मिती प्रकरणात वादात सापडलेला राज कुंद्रा जामिनावर सुटल्यानंतर अनेकदा ट्रोल होताना दिसतो.

प्रणाली मोरे

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी(Shilpa Shetty)चा नवरा बिझनेसमॅन राज कुंद्रा(Raj Kundra) अश्लीम फिल्म निर्मिती प्रकरणामुळे चांगलाच वादातीत चर्चेत सापडला होता. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांच टीमनं अश्लिल फिल्म बनवणं आणि त्याचं वितरण करणं या आरोपाखाली अटक देखील केली होती. त्यानंतर दीड-दोन महिने जेलची हवा खाल्ल्यानंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली. जामिनावर सुटका झाल्यानंतर राज कुंद्राला काही दिवसांतच अनेकदा शिल्पासोबत फिरताना पाहिलं गेलं. पण सध्या त्याला एका अशा विचित्र अवतारात पाहिलं गेलं की पाहणाऱ्याला विश्वास बसणार नाही. या विचित्र लूकमधला राज कुंद्राचा व्हिडीओ सध्या जोरदार सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आम्ही इथे बातमीत जोडला आहे,म्हणजे आपलाही विश्वास बसेल.

शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा सोमवारी १४ मार्च,२०२२ रोजी आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा पहायला गेला होता. त्याच दरम्यान तिथे उपस्थित मीडियाच्या फोटोग्राफर्सनी आपल्या कॅमेऱ्यात त्याला कैद करायची संधी सोडली नाही. पण त्यात मजेदार गोष्ट घडली ती अशी की राज कुंद्रानं आपला चेहरा दिसू नये म्हणून अजब ढंगाचं हूडी जॅकेट घातलं होतं. त्यानं गाडीच्या बाहरे पडताना त्या जॅकेटची कॅप पूर्ण चेहऱ्याला कव्हर करत झीपनं लॉक केली होती. हा मोठा जुगाड राज कुंद्रानं केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्या जॅकेटला फक्त डोळ्याच्या भागावर जाळीदार पट्टी होती. त्या जाळीतून दिसणाऱ्या राज कुंद्राच्या डोळ्यांवरनं स्पष्ट झालं की हूडी जॅकेटच्या आत कोण आहे. हे हूडी जॅकेट घालून राज कुंद्रा पूर्ण थिएटरभर मस्त फिरत होता. शेवटी अश्लील फिल्म निर्मितीत त्याला जेल झाली होती,त्यालाही माहित आहे उजळ माथ्यानं आजही फिरलो तरी लोकं तोंडावर शिव्या घालतील. शेवटी पब्लिक पावर डेंजर असते हे माहित असावं बहुतेक त्याला.

राज कुंद्रानं एवढे प्रय़त्न करुनही फोटोग्राफर्सच्या नजरांनी त्याला हेरलं,त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि केलं त्याला व्हायरल. राज कुंद्रा मात्र यामुळे ट्रोल झाला आहे. चेहरा लपवून फिरत असल्यामुळे त्याला लोकांनी चांगलेच टोमणे मारलेयत. आणि पुन्हा त्याच्या अश्लील व्हिडीओ प्रकरणाला उकरून काढत त्याला ट्रोल करण्याचीही संधी सोडली नाही. पण काहीजणांनी त्यानं रॅपर केनये वेस्टच्या लेटेस्ट लूकची कॉपी केलीय असंही म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT