Raj Kundra And Shilpa Shetty  esakal
मनोरंजन

Raj Kundra : 'मला पिक्चर काढायचा आहे म्हटल्यावर शिल्पानं तोंडावर चप्पल फेकून मारली'! काय होतं कारण?

शिल्पा शेट्टीला राजमुळे खूपच मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं.

युगंधर ताजणे

Raj Kundra And Shilpa Shetty : कुणाला वाटलं होतं की, शिल्पाचा पती राज कुंद्रा ज्याच्यावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ तयार करुन ते परदेशात पाठविल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याप्रकरणी त्याला काही दिवस तुरुंगाची हवाही खावी लागली होती. याच राज कुंद्राचा आता UT 69 नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे.

शिल्पा शेट्टीला राजमुळे खूपच मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे तिला ज्या रियॅलिटी शो मध्ये परिक्षकाची भूमिका देण्यात आली होती त्यातून तिनं काही काळापुरती माघारही घेतली होती. शिल्पाला नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ट्रोलही केले होते. अखेर तिनं राजमुळे मला विनाकारण ट्रोल केले जाऊ नये असे आवाहन देखील नेटकऱ्यांना केले होते.

राज कुंद्राचा काल एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये त्यानं मला काहीही बोला पण माझ्या बायको आणि मुलांना ट्रोल करु नका. अशी विनवणी त्यानं नेटकऱ्यांना केली होती. याचा परिणाम असा की, राजच्या आगामी चित्रपटाविषयी वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.त्याचा UT 69 चित्रपट चर्चेचा विषय आहे. त्याविषयी काही दिवसांपूर्वी फराह खान आणि मुनव्वर फारुखी यांनी प्रतिक्रिया दिली होती.

आपण जेव्हा चित्रपट काढणार आहोत आणि त्यामध्ये काम कऱणार असल्याचे शिल्पाला सांगितले तेव्हा तिचा संताप झाला होता. तिनं माझ्याकडे पाहून चप्पल भिरकावून दिली होती. याविषयी राजला विचारले असता त्यानं जी प्रतिक्रिया दिली ती चर्चेत आली आहे. न्युज १८ ला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये राजनं अनेक गोष्टींवर मोकळेपणानं मत व्यक्त केले आहे.

तो म्हणाला की, मी शिल्पाला म्हणालो की, माझ्याकडे चांगली स्क्रिप्ट आहे. आणि त्यात मला काम करण्याची इच्छा आहे. मी तिच्या उत्तराची वाट पाहत होतो. अचानक माझ्या तोंडावर चप्पल आली. मला कळालेच नाही. मी तिच्यापासून लांब बसलो होतो. त्यानंतर मला तिला काही विचारण्याचे धाडसही झाले नाही. त्यानंतर मी दिग्दर्शक शहनवाजला बोलावून घेतले. आणि तिला सांगितले की, एकदा शिल्पाबरोबर बोल तिला समजावून सांग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: “पंचहात्तरीची शाल अंगावर पडते तेव्हा..”; मोहन भागवत यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ! कुणाला दिला सल्ला?

Latest Maharashtra News Updates : आलमट्टी उंचीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, महाराष्ट्राचे शिष्टमंडळ भेटणार जलमंत्र्यांना

Pune News : रात्रीतून शहर स्वच्छतेला अखेर सुरुवात; पुणे पालिकेकडून १४७२ कर्मचारी, २१३ वाहनांचा वापर

Satara Accident: उलटा धबधबा पाहायला गेलेला युवक मोटारीसह ३०० फूट खाेल दरीत; जखमी युवक वेदनेने ओरडत होता अन् पोलिस...

Kolhapur Municipal : कोल्हापुरात रस्त्यांची दुर्दशा, शहर अभियंतापदाचा खेळखंडोबा; सव्वा महिन्यात हर्षजित घाटगेंची बदली

SCROLL FOR NEXT