raj thackeray, maharashtra shahir, ankush chaudhari, kedar shinde, shahir sable SAKAL
मनोरंजन

Maharashtra Shahir: आम्ही दहावी नापास विद्यार्थ्यांसारखे झालो आहोत... टिझर लाँच वेळी राज ठाकरेंचा मिश्किल अंदाज

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं टिझर आज राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला

Devendra Jadhav

Maharashtra Shahir Teaser: केदार शिंदेंच्या महाराष्ट्र शाहीर सिनेमाची सगळ्यांना उत्सुकता आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकत आहे.

महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा टिझर आज राज ठाकरेंच्या हस्ते लाँच झाला.

(raj thackeray at the teaser launch event of maharashtra shahir)

यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले.. "शाहीर आणि बाळासाहेब यांची फार जुनी मैत्री होती.

मी शाहिरांना लहानपणापासून पाहत आलोय. बाळासाहेबांना बाळ म्हणणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये शाहीर साबळे होते. या सिनेमाचं संगीत फक्त अजय - अतुल करू शक्य होते बाकी कोणी नाही.

राज ठाकरे पुढे खास मिश्किल अंदाजात म्हणाले.. "हा सिनेमा 28 एप्रिलला रिलीज होतोय. त्यावेळी केदार मी नाहीये. मी बाहेरगावी जात आहे.. कारण निवडणूका सध्या मार्च - एप्रिल दरम्यान किंवा ऑक्टोबर अशा होत असतात.

त्यामुळे आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यासारखी झाली आहे. अशा अंदाजात राज ठाकरे यांनी महाराष्ट्र शाहीर सिनेमाला शुभेच्छा दिल्या आणि सर्वांशी संवाद साधला.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या टिझरमध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दमदार अंदाजात झळकत आहे. शाहिरांची धगधगती गाथा अंकुश चौधरीने या सिनेमातून जिवंत केलीय.

या सिनेमात केदार शिंदेंची लेक सना शिंदे सुद्धा झळकत आहे. सिनेमात मृण्मयी देशपांडे लता मंगेशकरांची भूमिका साकारत आहे. याशिवाय आई कुठे काय करते फेम अश्विनी महांगडे सिनेमात झळकत आहे.

अजय - अतुल आणि केदार शिंदे अनेक वर्षांनी एकत्र काम करत आहेत. सिनेमात शाहीर साबळेंची अनेक श्रवणीय गाणी प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहेत.

केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर सिनेमात अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत झळकणार आहे. २८ एप्रिल २०२३ ला महाराष्ट्र शाहीर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT