Raj Thackeray felt awkward hero-heroine romance on the bullet While Film shooting 
मनोरंजन

Video : बुलेटवरील हिरो-हिरोईनचा रोमान्स पाहून म्हणे राज ठाकरेही लाजले!

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील कात्रज भागातील मांगडेवाडीत '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!'  या चित्रपटाच्या शुटिंगचा शुभारंभ झाला. चित्रपटाच्या शुटींगच्या पहिलाच सीन सध्या चांगलाच चर्चेत आहे. अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे  यांचा बुलेटवर रोमॅंटिक सीन शुट केला आहे. चित्रपटात हा सीन कसा दाखवणार? हे चित्रपटाच्या शुटींगनंतरच कळेल पण सुरुवातीच्या या व्हिडिओची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

राज ठाकरे यांनी या चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप दिला. त्यानंतर चित्रपटातील ''अभिनेत्याच्या बुलेटवर मागे बसलेली अभिनेत्री थेट बुलेटच्या टाकीवर येऊन त्याच्या गळ्यात पडते.'' अशा रोमॅंटिक सीनने चित्रीकरणाला सुरुवात झाली. बुलेटवरील हा सीन पाहिल्यानंतर चित्रपटाची मुहूर्त क्लॅप देणारे राज ठाकरे देखील थोडेसे लाजल्याची चर्चा सुरु आहे.  

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


उत्तम स्टारकास्ट आणि महत्त्वपूर्ण विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देऊन चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. 'मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त होणं आनंददायी आहे. आता पुढील काही दिवसांत पुणे आणि परिसरात चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात येईल,'असं दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी सांगितलं.

'उदाहरणार्थ निर्मित' या निर्मिती संस्थेनं या पूर्वी राजकीय आणि प्रेमकथा असलेल्या 'कागर'या चित्रपटाची निर्मिती केली होती. तर सुश्रुत भागवत यांनी मुंबई टाइम, पेईंग घोस्ट, असे एकदा व्हावे असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. या चित्रपटाची निर्मिती विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे-विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ. निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. वैभव जोशी यांचे गीतलेखन आणि अवधून गुप्ते संगीत दिग्दर्शन करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Latest Maharashtra News Live Updates: लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित

IT Park Kolhapur : कोल्हापुरात आय.टी. पार्कचा मार्ग अजून खडतर, कृषी महाविद्यालयाची मनधरणी करण्यातच जात आहेत दिवस

SCROLL FOR NEXT