Raj Thackeray News esakal
मनोरंजन

Raj Thackeray: राज यांची मोठी घोषणा, छत्रपती शिवाजी महाराजांवर काढणार चित्रपट

आपण शिवाजी महाराज वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवेत. महाराजांचे विचार जाणून घ्यायला पाहिजे.

सकाळ डिजिटल टीम

Har Har Mahadev Movie: आपण शिवाजी महाराज वेगळ्या प्रकारे समजून घ्यायला हवेत. महाराजांचे विचार जाणून घ्यायला पाहिजे. मला नेहमी वाटतं अफझल खान, वेगवेगळ्या लढाया यांच्यापलीकडे शिवाजी महाराज आहेत. आपण जर केवळ त्या चार ते पाच प्रसंगात अडकलो तर अवघड होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आगामी काळात चित्रपट काढणार असून तो दोन ते तीन भागांमध्ये येईल. आताच त्याविषयी काही सांगणार नाही. अशी घोषणा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध भावेनं हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीमध्ये राज यांनी आपल्या चित्रपट विषयक वेगवेगळ्या आठवणींना उजाळा दिला आहे. राज म्हणाले, हर हर महादेव हाच चित्रपट का, मला पहिल्यांदा व्हाईस ओव्हर दिला होता तो 2003 मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा ती अचानक जबाबदारी माझ्य़ावर आली होती. व्हाईस ओव्हर देणे हे माझे काम नाही. मी त्याचा कधीही विचार केला नाही. 2004 मी शिवसेनेचे कॅम्पेन केले होते. त्या 9 फिल्म्सचा आवाज अजित भुरे यांचा होता. मुंबईवरील बॉम्बस्फोटाच्या एका अॅड फिल्मला माझा आवाज होता. फिल्म झाली बाळासाहेबांना त्या आवडल्या.

चित्रपट बनवणे हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला तो आवडला तो मी वेगवेगळ्या अँगलनं पाहिला आहे. गांधी हा चित्रपट मी किती वेळा पाहिला असेल मलाच माहिती नाही. यावरुन माझी पत्नी मला नेहमीच टोकते. चित्रपटाची मला आवड आहे. चित्रपट हा एक सामुहिक सहभागाचा प्रयत्न असतो. खूप लोकांचे कष्ट असतात. त्या सगळ्या प्रयत्नांपैकी व्हाईस ओव्हर हा एक भाग आहे. तो काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी मी व्हाईस ओव्हर आहे.

जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा प्लाझाला गांधी चित्रपट लागला होता. कॉलेजच्या काळात पहिल्यांदाच असा मनात आला की एवढी भव्य चित्रपट शिवाजी महाराजांवर यायला हवा. त्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. नंतर लक्षात आले की, छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट होऊ शकत नाही. कारण ती खूप मोठी गोष्ट आहे. मी त्याविषयी अनेकांना विचारणाही केली होती. मात्र आता आपण स्वत: महाराजांवर चित्रपट काढण्याची विचार करतो आहोत. असे राज यांनी यावेळी सांगितली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT