Rajinikanth gives explaination about Meets UP CM Adityanath and Touches Feet At His Lucknow jailer  SAKAL
मनोरंजन

Rajinikanth: "ते लहान असले तरीही..!" योगी आदित्यनाथांच्या पाया पडल्यामुळे ट्रोल झालेल्या रजनीकांत यांनी दिले स्पष्टीकरण

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांना अलीकडेच योगी आदित्यानाथांच्या पाया पडल्याने ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं

Devendra Jadhav

रजनीकांत सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे.अलीकडे रजनीकांतने केलेल्या एका कृतीमुळे सुपरस्टारला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं आहे.

साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांनी अलीकडेच योगी आदित्यानाथ यांची भेट घेतली. शिवाय खाली वाकुन त्यांच्या पायाला स्पर्श केला. या सर्व प्रकरणानंतर नाराजी पत्करावी लागणाऱ्या यांनी अखेर या सर्व प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय.

रजनीकांत स्पष्टीकरण देताना काय म्हणाले?

रजनीकांत स्पष्टीकरण देताना म्हणाले की, "ही माझी एक सवय आहे. साधू असो वा योगी, त्यांच्या चरणांना स्पर्श करण्याची माझी सवय आहे. अगदी समोरचा माझ्यापेक्षा लहान असला तरी. मी तेच केले."

अशा मोजक्या शब्दात रजनीकांत यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलंय. इतकंच नव्हे रजनीकांतने आपला 'जेलर' चित्रपट यशस्वी केल्याबद्दल चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

रजनीकांत यांच्यावर त्यांचे फॅन्स नाराज का झाले?

रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या पायाला स्पर्श करुन नमस्कार केल्यामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला होता. सीएम योगींच्या पायाला हात लावल्यामुळे रजनीकांत यांना खूप ट्रोल करण्यात आले.

दोघांमधील वयातील अंतर पाहता रजनीकांत यांनी सीएम योगींच्या पायाला हात लावणे लोकांना आवडले नाही. लोक म्हणाले की सीएम योगी त्यांच्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत, त्यामुळे अभिनेत्याने त्यांच्या पायांना हात लावू नये.

आता या प्रकरणावर रजनीकांत यांनी प्रतिक्रिया दिली. अलीकडेच चेन्नई विमानतळावर रजनीकांत स्पॉट झाला आणि तिथे पापाराझींनी त्याला या प्रकरणाबद्दल बोलतं केलं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT