Rajinikanth sends wishes to Tiger Shroff on Ganapath release  esakal
मनोरंजन

Rajanikanth Post : साक्षात साऊथच्या देवानं 'थलायवा'नं जॅकीच्या 'टायगर'ला दिल्या शुभेच्छा! काय म्हणाले माहितीये?

केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत त्या साऊथच्या रजनीकांत यांची गोष्टच वेगळी आहे.

युगंधर ताजणे

Rajinikanth sends wishes to Tiger Shroff on Ganapath release : केवळ भारतच नाहीतर जगभरामध्ये ज्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत त्या साऊथच्या रजनीकांत यांची गोष्टच वेगळी आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभियनानं रजनीकांत यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. जेव्हा रजनीकांत हे कुणाचे कौतुक करतात तेव्हा ती गोष्ट खूपच खास असते.

त्याचे झाले असे की, प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरचा गणपत नावाचा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यानं पहिल्याच दिवसापासून चांगल्या कमाईला सुरुवात केली आहे. त्याच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता टायगर श्रॉफचा गणपतमधील परफॉर्मन्स पाहून साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्यांना देव मानले जाते त्या थलायवा रजनीकांत यांनी टायगरचे कौतुक केले आहे.

रजनीकांत यांचा दोन महिन्यांपूर्वी जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला होता. त्यानं चारशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. येत्या लोकेश कनगराज यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सध्या रजनीकांत यांनी टायगरचे केलेलं कौतुक चर्चेचा विषय आहे.

विकास बहल यांनी दिग्दर्शित केलेला गणपतमध्ये टायगरनं महत्वाची भूमिका साकारली आहे. यावेळी त्याच्या जोडीला बिग बी अमिताभ बच्चन आणि क्रिती सेनॉन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रजनीकांत यांनी टायगरच्या या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय जॅकी श्रॉफला धन्यवाद दिले आहे.

रजनीकांत यांनी लिहिलं आहे की, टायगर तुला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. याशिवाय टायगरच्या संपूर्ण टीमला मी शुभेच्छा देतो. असे म्हणत त्यांनी ती पोस्ट जॅकी श्रॉफ आणि टायगला टॅग देखील केली आहे. ही पोस्ट व्हायरल होताच त्यावर जॅकी श्रॉफ यांनी थलायवा यांना धन्यवाद दिले आहे. थलायवा रजनी सर तुमचे खूप खूप धन्यवाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT