Rajinikanth Co Star Ritika Singh Injured:  Esakal
मनोरंजन

Ritika Singh Injured: प्रसिद्ध साउथ अभिनेत्रीचा शुटिंग दरम्यान अपघात! रजनीकांतसोबत 'थलाइवर 170'मध्ये करतेय काम

साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा अपघात झाला आहे.

Vaishali Patil

Rajinikanth Co Star Ritika Singh Injured: साउथ इंडस्ट्रीमधून एक बातमी समोर येत आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा अपघात झाला आहे. थलायवर 170 चित्रपटात काम करणाऱ्या रितिका सिंह हिचा शुटिंग दरम्यान अपघात झाला आहे.

सध्या रितिकाचा फोटो आणि एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तिची खूपच अवस्था वाईट झालेली दिसत आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काचेचे तुकडे तिच्या हातात घुसले होते. त्या जखमांमधून रक्तस्त्राव होत होता.

शूटिंगदरम्यान तिचा अपघात झाल्याचे वृत्त आहे. रितिकाने ही माहिती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मात्र, यावेळी तिने ती कोणत्या चित्रपटाच्या सेटवर जखमी झाली हे सांगितले नाही.

रजनीकांत यांची को-स्टार रितिका सिंगने स्वतः हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि ती कशी जखमी झाली हे चाहत्यांना सांगितले आहे. रितिकाने सांगितले की, शूटिंगदरम्यान तुटलेल्या काचामुळे ती जखमी झाली. तिची प्रकृती सध्या ठीक नाही.

इंस्टाग्राम स्टोरीजवर तिच्या दुखापतीचा फोटो शेअर करताना रितिका सिंगने लिहिले की, 'असे वाटते की मी वेअरवॉल्फशी भांडले आहे!'

नंतर तिने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये अभिनेत्रीने शूटिंग दरम्यान तिच्यासोबत काय घडले ते सांगितले. 'मी खूप अस्वस्थ आहे... सगळ्यांनी मला सावध राहायला सांगितलं कारण तिथं तुटलेली काच होती. त्यांनी मला सावध केलं होतं.. ठीक आहे, असं घडतचं. कधी कधी आपण काही गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाही ? मला वाटते की मी नियंत्रण गमावले आणि नंतर ही घटना घडली.'

रितिकाने तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती अभिनेत्री असण्यासोबतच माजी मिक्स्ड मार्शल आर्टिस्ट आहे. ती आर माधवनच्या 'साला खडूस' या चित्रपटातही दिसली होती. आता ती रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटात दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT