Rajinikanth's film 'Jailer' A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to watch jailer SAKAL
मनोरंजन

Jailer Rajinikanth: रजनीकांतचे जपानी फॅन! सातासमुद्रापार जेलर सिनेमा पहायला आलं जपानी जोडपं, सिनेमा पाहून म्हणाले...

रजनीकांतचा सिनेमा पाहायला एक जपानी जोडपं चक्क भारतात आलं, हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय

Devendra Jadhav

Rajinikanth Jailer: सुपरस्टार रजनीकांतचा जेलर सिनेमा आज सगळीकडे रिलीज झालाय. रजनीकांतचा सिनेमा पाहणं ही त्याच्या फॅन्ससाठी पर्वणी असते.

भारतातच नव्हे तर जगभरातल्या फॅन्सच्या मनात रजनीकांतच्या सिनेमाबद्दल वेगळीच क्रेझ असते. याचा अनुभव नुकताच आलाय. रजनीकांतचा सिनेमा पाहायला एक जपानी जोडपं चक्क भारतात आलं आणि त्यांनी थैलयवाच्या सिनेमाचा अनुभव घेतला.

(Rajinikanth's film 'Jailer' A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to watch jailer)

'जेलर'चा हँगओव्हर थेट जपानमध्ये

'जेलर' सिनेमाची क्रेझ किती जास्त आहे, याची आपण कल्पनाच करु शकत नाही. कारण जेलरचा हँगओव्हर थेट जपानी प्रेक्षकांच्याही डोक्यावर आहे. जपानचे एक जोडपे भारतात आले आहे.

थलैवाचा 'जेलर' एन्जॉय करण्यासाठी हे जपानी जोडपे तामिळनाडूला पोहोचले. जपानी जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते रजनीकांत यांच्यावरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

रजनीकांतचा सिनेमा पहायला जपानी जोडपे जपानमधून भारतात आले

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये जपानमधील यासुदा हिदेतोशी (Yasuda Hidetoshi) म्हणतात की, ते जेलर सिनेमा पाहण्यासाठी भारतात आले आहेत. ते सध्या चेन्नईत आहेत.

हा व्हिडिओ रजनीकांत यांच्या फॅन पेजवरही शेअर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर यासुदा हिदेतोशी जपानमध्ये रजनीकांतचा फॅन क्लब चालवतात. ते या क्लबचे अध्यक्ष आहेत

जेलरचं बॉक्स ऑफीसवर

'जेलर'चे पहिल्या दिवशीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 11 ऑगस्टला समोर येईलच. पण अॅडव्हान्स बुकिंगचे आकडे पाहता, पहिल्या दिवशी जेलर सिनेमाची 42 कोटी रुपयांची कमाई होऊ शकते असा अंदाज आहे.

'जेलर'ने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच सुमारे 13 कोटींचा व्यवसाय केला. विशेष म्हणजे रजनीकांत यांचा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचे सरकार डळमळीत?, फुटण्यासाठी एका आमदाराला ३५ कोटींची ऑफर, तिघांना अटक

LPG Price Today: कमर्शियल LPG सिलेंडर 183 रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर आता घरगुती गॅसचे दर जाहीर! पाहा तुमच्या शहरातील नवे भाव

Belgium vs Senegal : ३ मिनिटांत बाजी पलटली, बेल्जियमने ०-२ अशा पिछाडीवरून मॅच फिरवली; लढवय्या सेनेगलचा दुर्दैवी पराभव

Latest Marathi News Live Update : एल्फिन्स्टन ब्रिज परिसर जलमय, सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

SCROLL FOR NEXT