Rajkumar Hirani Dunki Director Munna Bhai 3 movie  esakal
मनोरंजन

Munna Bhai 3: अरे मामू, 'मुन्नाभाई ३ ' येतोय! राजकुमार हिरानी यांनी दिली मोठी अपडेट

प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत.

युगंधर ताजणे

Rajkumar Hirani Dunki Director Munna Bhai 3 movie : प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी हे नेहमीच त्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक आहेत. त्यांच्या चित्रपटांची मांडणी, सादरीकरण हे चाहत्यांची पसंती मिळवून जाते. मग तो चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस असो किंवा लगे रहो मुन्नाभाई असेल... यात प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटांनी वेगळे स्थान निर्माण केले आहे.

गेल्या काही वर्षांपासून हिरानी हे मुन्नाभाईच्या तिसऱ्या चित्रपटाच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात हिरानी यांनी एका मुलाखतीमध्ये त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. प्रेक्षक, चाहते यांनाही मुन्नाभाईच्या तिसऱ्या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात हिरानी काय म्हणाले हे आपण जाणून घेणार आहोत.

२००३ मध्ये हिरानी यांचा मुन्नाभाई एमबीबीएस आला होता. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती. संजय दत्त, अर्शद वारसी, ग्रेसी सिंह, बोमन इराणी यांच्या त्यात महत्वाच्या भूमिका होत्या. मुन्नाभाई एमबीबीएसच्या निमित्तानं पहिल्यांदाच एकत्र आले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

आता हिरानी यांनी संजय दत्त आणि अर्शद वारसी यांना उद्देशूनही मुन्नाभाईच्या तिसऱ्या पार्टविषयी भाष्य केले आहे. ते म्हणतात, मी गेल्या काही वर्षांपासून मुन्नाभाई ३ च्या स्क्रिप्टवर काम करतो आहे. पण मला अजुनही मनासारखी स्टोरी काही केल्या मिळत नाही. आता माझ्याकडे त्या चित्रपटाशी संबंधित चार ते पाच स्क्रिप्ट तयार आहे. त्यात आणखी बदल करण्याची गरज आहे असे मला वाटते.

२००६ मध्ये लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट आला आणि पुन्हा हिरानी यांची चर्चा सुरु झाली. त्यांच्या पहिल्या चित्रपटाप्रमाणेच हा चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला होता. त्यानं देखील बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळाले होते. गांधीगिरीला एका वेगळ्या प्रकारे हिरानी यांनी मोठ्या पडद्यावर आणले होते. ते प्रेक्षकांना कमालीचे आवडून गेले. त्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला होता.

त्या मुलाखतीमध्ये हिरानी म्हणतात की, मला माहिती आहे की, प्रेक्षकांना मुन्नाभाई ३ विषयी प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. पण अजुनही स्क्रिप्ट मिळत नाही. मला तर केव्हापासून मुन्नाभाई ३ तयार करायचा आहे. बघू येत्या वर्षात नव्यानं आणखी काही समोर येते का....अशा शब्दांत हिरानी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुसळधार पावसाचा हाहाकार! पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे रस्ते बंद

Nagpur Election: प्रभाग रचनेने धक्का, आता आरक्षणावर नजर; किरकोळ बदलांसह महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुकांमध्ये नाराजी

Mumbai Crime News : महिलेच्या नावाने इंस्टाग्राम अकाउंट काढलं अन् नको ते व्हिडिओ टाकले... मुंबईत नेमक काय घडलं?

Latest Marathi News Live Update: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची कार्यकारणी जाहीर

'माधुरी तुला ब्लाऊज काढावा लागेल' दिग्दर्शकाने केली अभिनेत्रीकडे विचित्र मागणी, म्हणाले... 'आम्ही तुला अंर्तवस्त्रामध्ये'

SCROLL FOR NEXT