Rajkumar Hirani Dunki Director Reaction esakal
मनोरंजन

Rajkumar Hirani: शाहरुख की आमिर? सगळ्यात कोण भारी, राजकुमार हिरानींनी कुणाचं घेतलं नाव?

बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शख राजकुमार हिरानी यांचा डंकी नावाचा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला.

युगंधर ताजणे

Rajkumar Hirani Dunki Director Reaction : बॉलीवूडमधील प्रख्यात दिग्दर्शख राजकुमार हिरानी यांचा डंकी नावाचा चित्रपट २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच शाहरुख सोबत चित्रपट करत चाहत्यांना आगळी वेगळी ट्रीट दिल्याचे दिसून आले. आतापर्यत या चित्रपटानं भारतातून दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.

डंकीच्या प्रमोशनच्या निमित्तानं राजकुमार हिरानी यांनी अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या आहेत. यामध्ये त्यांनी त्यांच्यासोबत काम केले आहे त्या कलाकारांविषयीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यामध्ये त्यांना एका मुलाखतीमध्ये तुम्हाला आमिर की शाहरुख यांच्यापैकी सगळ्यात बेस्ट कोण वाटते, असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेलं उत्तर हे आता नेटकऱ्यांच्या कमेंटचा विषय आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतींसाठी नेहमीच प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या कौतुकाचा विषय असणाऱ्या हिरानी यांच्या चित्रपटांची चाहते नेहमीच वाट पाहत असतात. त्यांच्या थ्री इटियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि पीके या चित्रपटांना प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. संजूमधून तर त्यांनी रणबीरला स्टार म्हणून समोर आणले. अशा या दिग्दर्शकाच्या डंकीलाही प्रेक्षक पसंत करताना दिसत आहे.

काय म्हणाले हिरानी?

हिरानी यांनी आमिर आणि शाहरुख सोबत काम करण्याचा अनुभव कसा होता यावर दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. ते म्हणाले, आमिर आणि शाहरुख हे दोन्हीही प्रचंड मेहनती अभिनेते आहेत. ते त्यांच्या मेहनतीनं मोठे झालेले स्टार्स आहेत. त्या दोघांची लोकप्रियताही मोठी आहे. त्यांचा कुठलाही चित्रपट असो प्रेक्षक, चाहते हे कमालीचे उत्सुक असल्याचे दिसून येतात. ते त्यांच्या कमिटमेंटसाठी ओळखले जातात.

सेटवर सर्वाधिक कोण प्रभावीपणे काम करतं असा प्रश्न जेव्हा तुम्ही मला विचारता तेव्हा मला सांगावेसे वाटते की, त्या प्रत्येकाची काम करण्याची स्टाईल वेगळी आहे. मी बऱ्याच वर्षांपासून शाहरुख सोबत काम करण्याची इच्छा ठेवून होतो. ती पूर्ण झाली. तो एक प्रभावी अभिनेता आहे. मी फिल्म इंस्टिट्युटचा विद्यार्थी होतो. जेव्ही मी त्या संस्थेतून बाहेर पडलो तेव्हापासून माझी इच्छा होती की, एकदा का होईना शाहरुखसोबत काम करायचे.

राजकुमार हिरानी यांचा नुकताच डंकी नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये शाहरुख खान, तापसी पन्नु, विकी कौशल आणि विक्रांत कोचर यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT