a r rahman , gandhi godse ek yudh, gandhi godse ek yudh film controversy SAKAL
मनोरंजन

Gandhi - Godse Ek Yudh: काही लोकांनी गृहीत धरलं आणि संतोषी बळी ठरले.. ए. आर. रेहमानची उघड नाराजी

'गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा' आज २६ जानेवारीला रिलीज होतोय.

Devendra Jadhav

Gandhi - Godse Ek Yudh: 'गांधी गोडसे एक युद्ध सिनेमा' आज २६ जानेवारीला रिलीज होतोय. हा सिनेमा सुरुवातीपासून चर्चेत आहे. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे या दोघांमधील विचारांचं युद्ध या सिनेमातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाला सुरुवातीपासून काही संघटनांकडून विरोध होतोय. सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानने या सिनेमाला संगीत दिलंय. इतके दिवस सिनेमाविरुद्व जे वाद झाले त्याविषयी ए आर रेहमान काही म्हणाला नाही. पण आता मात्र रेहमानने मौन सोडलं आहे.

गांधी गोडसे एक युद्ध सिनेमाबद्दल सुरुवातीपासून विविध कारणांवरून वाद सुरु आहे. ए. आर. रेहमान त्याविषयी म्हणाला,"ज्यांनी सिनेमा पाहिला नाही, त्यांनी गृहीत धरले आहे.. आणि फक्त ट्रेलर पाहून सिनेमाचे फिल्ममेकर्स गांधींना डावलून नथुराम गोडसेची बाजू घेत आहेत असं म्हणत आहेत. एकूणच लोकांनी सिनेमाच्या निर्मात्यांवर विश्वास ठेवणे सोडले आहे. दुर्दैवाने... राजकुमार संतोषी या सगळ्या गोष्टींचे बळी ठरले आहेत" अशा शब्दात ए आर रेहमान यांनी त्यांची नाराजी व्यक्त केलीय.

काल २५ जानेवारीला पठाण रिलीज झालाय. तर आज म्हणजेच २६ जानेवारीला राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी - गोडसे' प्रदर्शित होतोय. त्यामुळे एकूणच पठाण सोबत गांधी - गोडसे सिनेमाचा सामना रंगणार असं चित्र दिसतंय. राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे एक युद्ध' सिनेमात चिन्मय मांडलेकर नथुराम गोडसेंची भूमिका साकारतोय. नथुराम गोडसे महात्मा गांधींवर गोळ्या झाडतो पण गांधी त्यातून वाचतात, पुढे गांधींना नथुरामला भेटण्याची इच्छा असते, अशी या सिनेमाची भन्नाट कल्पना आहे.

रिलीजआधीच सिनेमाची चर्चा आहे. परंतु पठाण या बिग बजेट सिनेमासमोर गांधी - गोडसे सिनेमा टिकणार कि सपशेल आपटणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमा आधीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी धमकीचे फोन आल्याने राजकुमार संतोषी यांनी पोलीस संरक्षण मागितलं होतं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT