rajpal yadav in sangli dance video viral shooting his upcoming bollywood movie kaam chalu hai SAKAL
मनोरंजन

Rajpal Yadav: राजपाल यादव सांगलीच्या प्रेमात, ढोल ताशांच्या वादनावर जबरदस्त थिरकला, व्हिडीओ व्हायरल

राजपाल ढोल - ताशांच्या गजरात सांगली शहरात भन्नाट नाचताना दिसतोय

Devendra Jadhav

Rajpal Yadav in Sangli Dance Video Viral: ज्याच्या अफलातुन विनोदी टायमिंगने अनेक जण त्याचे फॅन्स आहेत असा कॉमेडी कलाकार म्हणजे राजपाल यादव. राजपाल यादवने आजवर अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवलंय.

सध्या राजपाल यादव आणि सांगली शहराचं वेगळं नातं पहायला मिळतंय. राजपाल सध्या सांगलीत त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. अशातच राजपालचा सांगलीतला एक व्हिडीओ व्हायरल झालाय. यात राजपाल ढोल - ताशांच्या गजरात भन्नाट नाचताना दिसतोय.

(rajpal yadav in sangli dance video viral)

ढोल ताशांच्या गजरात राजपाल थिरकला

राजपालचा सांगलीतला एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत राजपालच्या आजुबाजुला महिलांचं पथक ढोल - ताशाचं वादन करतंय. राजपालने सफेद कुर्ता आणि जीन्सची पँट घातलीय.

पुढे ढोल - ताशांच्या गजरात राजपाल संपूर्ण एनर्जीने नाचताना दिसतोय. राजपालच्या या डान्सचा सांगलीतली माणसं सुद्धा तितकाच आनंद घेताना दिसत आहेत. सध्या राजपाल शुटींग निमित्ताने सांगली शहरात आहे. हा व्हिडीओ बघुन राजपाल सांगलीच्या प्रेमात पडलाय, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही

राजपालचा आगामी सिनेमा आणि सांगली शहर

राजपालची सध्या त्याच्या आगामी काम चालु है सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये काय भूमिका असणार याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. सध्या या सिनेमाचा फर्स्ट लूक व्हायरल झाला असून राजपालच्या पाठीमागे सांगलीचा बोर्ड दिसून येतो.

राजपाल हा सध्या सांगलीमध्ये चित्रिकरणासाठी आला असून त्याची जोरदार चर्चाही सुरु आहे. पलक मुच्छलचे भाऊ पलश मुच्छल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच या चित्रपटाचे लेखनही केले आहे.

आईचा सल्ला राजपालने गांभीर्याने घेतला

चुप चुप के चित्रपटावरुन राजपालच्या आईनं त्याला तू नेहमीच मार खातो कधीतरी हिरो हो असे म्हटले होते. यानंतर मी काही वेगळ्या भूमिकांचा विचार केला त्यानुसार वाटचाल करण्याचा प्रयत्न केल्याचे राजपालने म्हटले आहे.

यासगळयात आता राजपालचा नवा चित्रपट येतो आहे. त्याचे नाव 'काम चालू आहे' असे आहे. त्याच्या पोस्टरनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सध्या या सिनेमाचं सांगलीत शुटींग सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT