Raju Punjabi popular Haryanavi singer passes away at 40  SAKAL
मनोरंजन

Raju Punjabi Death: संगीतविश्वावर शोककळा! सुप्रसिद्ध गायक राजू पंजाबीचं निधन, ४० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सुप्रसिद्ध हरयाणवी गायक राजू पंजाबी यांच्या निधनाने संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे

Devendra Jadhav

Raju Punjabi Passed Away News: हरियाणाचे प्रसिद्ध गायक राजू पंजाबी या्ंचं निधन झालंय. राजू पंजाबी यांच्या निधनाने त्यांचे चाहते आणि संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सपना चौधरी आणि राजू पंजाबी या दोघांची जोडी हिट होती. राजू गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल होता. आज मंगळवारी पहाटे ४ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासुन राजू काविळीच्या आजाराने ग्रस्त होते.

(popular Haryanavi singer Raju Punjabi passes away at 40)

राजू पंजाबींच्या निधनाने हरियाणवी म्युझिक इंडस्ट्रीला मोठा धक्का बसलाय. राजू यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीय शोकसागरात बुडालंय. १२ ऑगस्टला राजूचं मिलके यारा हमको अच्छा लगा था हे शेवटचे गाणे रिलीज केले. याशिवाय देसी देसी, अच्छा लागे से, तू चीज लाजवाब, भांग मेरे यारा ने, आणि लास्ट पेग अशी राजूची गाणी सोशल मिडीयावर तुफान लोकप्रिय आहेत. अभिनेत्री आणि युट्यूबर सपना चौधरीसोबतची राजूची जोडी सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडली आहे.

इंडस्ट्रीत राजूसोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी कलाकाराच्या अकस्मात निधनाबद्दल दुःख व्यक्त केलंय. राजू पंजाबी हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. राजू पंजाबी यांच्यावर त्यांच्या मूळ गावी रावतसर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(Latest Marathi News)

राजू पंजाबी अवघे ४० वर्षांचे होते. राजूला कावीळ झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना तेथून डिस्चार्जही देण्यात आला. मात्र त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती बिघडू लागली आणि त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले. परंतु आता उपचारादरम्यान राजू यांची प्राणज्योत मालवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Case : लोहगड खूनप्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल यांचे आजोबा देवीचंद अग्रवाल यांचे उपचारादरम्यान निधन

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT