Raju Srivastav Birth Anniversary remembering his yamraj video sakal
मनोरंजन

Raju Srivastav Birth Anniversary: जातानाही हसवून गेला.. असा विनोदवीर होणे नाही..

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव याची आज पहिली जयंती..

नीलेश अडसूळ

Raju Srivastav: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, किस्से, विनोद, स्टँडअप यआपल्या सोबत आहे. त्यांच्या जाण्यानंतरही त्यांनी आपल्याला हसवण्याचं काम सुरूच ठेवलं आहे, ही गोष्ट फक्त राजुच करू शकतात. विशेष म्हणजे जातानाही ते चाहत्यांना हसवून गेले.. त्याचाही एक खास किस्सा आहे.

(Raju Srivastav Birth Anniversary remembering his yamraj video)

कॉमेडीचा बादशहा म्हणून राजू यांची मनोरंजन विश्वाला ओळख होती. आपल्या विनोदी अंदाजानं राजू यांनी चाहत्यांचे, प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. मोठ्या संघर्षातून आपली स्वताची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या राजू यांना चाहत्यांचे प्रचंड प्रेम मिळाले. द ग्रेट इंडियन लाफ्टर चँलेजमधून त्यांनी मनमुराद प्रेक्षकांना हसवले.

राजू यांनी त्यांच्या हयातीत आपल्याला हसवलंच पण जातानाही ते हसवून गेले. त्याचाही एक खास किस्सा आहे. यांच्या जाण्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट, व्हिडिओ व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यामध्ये राजू यांचा यमराजांवरील व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यामध्ये त्यांनी यमराजावर आपल्या खास अंदाजात टिप्पणी केली होती.

एखाद्या व्यक्तीला मरणाच्या दारात असताना देखील कसे असले पाहिजे यावर राजू यांनी त्या व्हिडिओमध्ये विनोदी ढंगात उत्तर दिलं होतं. तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी त्याला एक कॅप्शन दिले होते. यमराजाच्या रेड्यावर बसायचंय? त्यावर राजू म्हणतात, ''आयुष्यात असं काही काम करा की, यमराजही तुम्हाला न्यायला आले तरी ते तुम्हाला म्हटले पाहिजे, महाराज, तुम्ही रेड्यावर बसा. आम्ही पायी येतो....तुम्ही पायी चालणं आम्हाला आवडणार नाही...'' असा हा विडिओ त्यांनी निधनाच्या काही महीने आधीच शूट केला होता. त्यांच्या निधनानंतर तो अधिक व्हायरल झाला आणि आयुष्यभर ज्याने हसवलं तो जातानाही हसवून गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील निवडणूक मोदी शाहांनी आपल्यावर घेतली : आशुतोष रांका

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT