raju srivastava wife shikha srivastava wants to enter in politics for husbands unfulfilled dream sakal
मनोरंजन

Raju Srivastav: राजू श्रीवास्तव यांची पत्नी राजकारणात? म्हणाल्या.. त्यांची अपुरी इच्छा..

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा लवकरच राजकारणात येतील असे दिसते आहे.

नीलेश अडसूळ

Raju Srivastav: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी आणि कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी, किस्से, विनोद, स्टँडअप यआपल्या सोबत आहे. त्यांनी आपल्याला प्रचंड हसवलं. त्यामुळे त्यांच्या निधनाने सारेच शोकाकुल झाले. त्यांच्या घरच्यांनाही हा मोठा धक्का होता. पण आता त्यांच्या अपुऱ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या घरचे पुढे आले आहेत.

(raju srivastava wife shikha srivastava wants to enter in politics for husbands unfulfilled dream)

त्यांच्या मागे त्यांची पत्नी शिखा आणि मुलगी अंतरा आणि मुलगा आयुष्यमान असा परिवार आहे. सध्या दुःखातून सावरत त्यांच्या घरचे पुढे जात आहेत. अशातच एका मुलाखतीत राजू यांच्या पत्नीने राजू यांची एक अर्धवट राहिलेली इच्छा बोलून दाखवली एवढेच नव्हे तर ती पूर्ण करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

त्या म्हणाल्या, 'ते एक कलाकार होते आणि त्यांचा वारसा आमची दोन्ही मुलं पुढे चालवत आहेत. मुलगी अंतरा एका प्रोडक्शन हाऊस मध्ये काम करते, तर मुलगा आयुष्मान सितार वादनात पुढे जात आहे. या व्यतिरिक्त त्यांना राजकारणात खूप रस होता. तशी सुरवातही त्यांनी केली होती. परंतु त्यांचं ते काम अर्धवट राहिलं आहे.

'राजू यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आणि शेवटच्या काळात ते राजकारणात सक्रिय झाले. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे ते ब्रँड अँबेसिडर झाले. चित्रपट विकास मंडळाचेही ते अध्यक्ष झाले. या क्षेत्रातही त्यांना बरंच काम करायचं होतं पण त्यांच्या निधनाने त्यांचे हे स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यामुळे मला जर संधी मिळाली तर मी त्यांचं स्वप्न पूर्ण करेन,' असे त्या म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Trades : चेन्नईने सॅमसनच्या बदल्यात जडेजा अन् सॅम करणला का जाऊ दिलं? CSK ने अखेर सांगितली Inside Story

IND vs SA Test: रवींद्र जडेजाने घडवला इतिहास! दहावी धाव घेताच कपिल देव यांची केली बरोबरी

YouTube बनला तुमचा AI असिस्टंट! प्रत्येक व्हिडिओला विचारू शकता कोणताही प्रश्न; क्षणात मिळणार उत्तर..कसं वापरायचं? पाहा

म्हणून मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीने अभिनय करणं सोडलं; सांगितलं धक्कादायक कारण, म्हणाली- अपमानास्पद बोलणं...

Crime News : पूर्वजांच्या मोक्षासाठी आईनेच घेतला दोन लेकरांचा बळी, सासऱ्याच्याही हत्येचा प्रयत्न; धक्कादायक घटनेने सगळेच हादरले

SCROLL FOR NEXT