Raju Srivastava's funeral to be held today in Delhi  sakal
मनोरंजन

Raju srivastava: राजू श्रीवास्तव यांच्यावर आज अंत्यसंस्कार, दिल्लीतील..

गेली काही दशके प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी काल अखेरचा श्वास घेतला.

नीलेश अडसूळ

Raju Srivastava funeral: गेली काही दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे सुप्रसिद्ध विनोदी कलाकार म्हणजे स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांनी काल 21 सप्टेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला. गेली 42 दिवस ते दिल्लीतील एम्स रुग्णालायत उपचार घेत होते. १० ऑगस्ट रोजी त्यांना जीम मध्ये हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांच्यावर सर्वतोपरी उपचार करूनही त्याला यश आले नाही. अखेर बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. आज त्यांच्या पार्थिवावर दिल्लीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Raju Srivastava's funeral to be held today in Delhi)

राजू श्रीवास्तव यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्या पार्थिवावर आज 22 सप्टेंबर रोजी तर सकाळी 8 वाजता दशरथपुरी येथून अंत्ययात्रा निघणार आहे. तर सकाळी 10 वाजता दिल्लीतील निगम बोध येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. रुग्णालयातील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू यांना 42 दिवस उपचार देण्यात आले. त्यांना आयसीयू विभागात व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. त्यांची अँजिओप्लास्टी देखील करण्यात आली होती. परंतु उपचारांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाला नाही. अखेर बुधवारी 21 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

राजू श्रीवास्तव यांच्या अचानक जाण्याने मनोरंजन श्रृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राजू यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. आज राजू यांच्यावर दिल्ली येथे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला असल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Crisis : भारतात पुन्हा एलपीजी सिलिंडरचा तुटवडा जाणवणार? इराण-अमेरिका युद्धामुळे वाढली चिंता, घरगुती गॅस महागणार?

Kuldeep Yadav: एकाच सामन्यात १० विकेट्स... कुलदीपचा इंग्लंडमध्ये कहर! नोंदवली सर्वोत्तम कामगिरी

Inspiring Story : शेतकऱ्याच्या मुलानं नाकारल्या तब्बल 11 सरकारी नोकऱ्या; आईचं स्वप्न पूर्ण करत अखेर बनला SDM, 12 व्या प्रयत्नात श्यामनं कसं मिळवलं यश?

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Society Anandotsav Competition : गणेशोत्सवात सोसायटी सजवा अन् जिंका बंपर बक्षीस; रितेश-जेनेलियाला भेटण्याचीही संधी!

SCROLL FOR NEXT