Raqesh Bapat
Raqesh Bapat Instagram
मनोरंजन

राकेश बापटला तातडीने काढलं 'बिग बॉस'च्या घराबाहेर; कारण...

सकाळ डिजिटल टीम

बिग बॉसचं पंधरावं पर्व सध्या चांगलंच रंगलं आहे. हा सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. घरात होणारे टास्क, वाद-विवाद आणि धमाल चाहत्यांना आवडत आहे. त्यातच गेल्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांपैकी विधी पंड्या आणि डोनल बिश्त हे दोघेही घराबाहेर पडले. तर दुसरीकडे 'बिग बॉस ओटीटी'चा स्पर्धक आणि अभिनेता राकेश बापटची वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. पण राकेशला काही दिवसातच घराबाहेर पडावं लागलं. वैद्यकीय कारणामुळे राकेशला तातडीने घराबाहेर काढावं लागलं.

अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट ‘बिग बॉस ओटीटी’ या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आले होते. आता हिच जोडी सलमान खान सूत्रसंचालन करत असलेला शो ‘बिग बॉस १५’मध्ये पुन्हा दिसत आहे. पण आता राकेश बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्याची प्रकृती खालावल्यामुळे राकेशला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ९ नोव्हेंबरला रात्री अचानक राकेशला असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्यामुळे त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी किडनी स्टोनमुळे वेदना होत असल्याचं सांगितलं. तसंच राकेश लवकर बरा होऊन पुन्हा बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी होऊ शकतो अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राकेशने बिग बॉस ओटीटीद्वारे प्रेक्षकांना खूप मनोरंजन केलं. जेव्हा तो बिग बॉस सीझन १५ मध्ये आला, तेव्हा त्याचे चाहते फार खूश झाले होते. पण राकेशच्या या कारणामुळे बाहेर जाण्यामुळे त्याचे चाहते निराश झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT