Rakhi Sawant And Adil Khan Durrani Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: लग्नाचा पत्ता नाही अन् राखी गरोदर? म्हणाली,..

Vaishali Patil

Rakhi Sawant And Adil Khan Durrani: बॉलिवुडची ड्रामा क्वीन म्हणून अभिनेत्री राखी सावंतला ओळखली जाते. ती कुठेही गेली तरी सर्वांचे लक्ष वेधून घेते. राखी सावंत तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा तिच्या पर्सनल लाईफमुळे जास्त चर्चेत असते.

अलीकडेच राखी सावंतने तिचा प्रियकर आदिलसोबतच्या लग्नाचा खुलासा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. तर काहींना यात काहीच नवीन वाटले नाही कारण राखी काहीही करु शकते.

राखी सावंतने 7 महिन्यांपूर्वी प्रियकर आदिल खान दुर्रानीसोबत लग्न करून कोर्टात लग्न केल्याचा खुलासा केला आहे. या खुलाशासोबतच अभिनेत्रीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाचे पुरावेही सादर केले आहेत. मात्र आदिल या लग्नाला न स्वीकारत आहे ना नाकारत आहे. आदिलने दहा ते बारा दिवसांचा वेळ मागितला आहे.

आदिलच्या नकारानंतर राखी हळूहळू सर्व खुलासे करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीच्या एका विधानाने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे की ती आई होणार आहे का?

राखी सावंत म्हणाली, 'मी आदिलसोबत लग्न केल्याचा खूप आनंद झाला आहे. त्याने नकार देण्याचं कारण काय आहे हे मला माहीत नाही. आदिल लग्नाला का नकार देत आहे याचा मला धक्का बसला आहे.गेल्या सात महिन्यांपासून मी त्याला सांगत होतो की, आपण आपल्या लग्नाबद्दल सर्वांना सांगायला हवं. कारण मी एक सेलिब्रिटी आहे. माझं जीवन कोणापासून लपलेले नाही. हे शक्य आहे की प्रेग्नंट होऊ शकते किंवा काहीही होऊ शकते'

राखी सावंतकडून जेव्हा प्रेग्नेंसी विषयी प्रश्‍न विचारला गेला तेव्हा तिने मला सध्या हे सांगायचे नाही असं सांगितलं. सध्या मी लग्नाबाबत जे खुलासे केले आहे ते खूप महत्वाचे आहे. ही गोष्ट सर्वांसमोर आली नसती तर खूप त्रास झाला असता.

मला खूप भीती वाटते. माझ्या आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. फॅमिली प्लॅनिंगवर राखी सावंत म्हणाली की, 'मी जरी सिंगल मदर झाली तरी मी मरेपर्यंत आदिलवर प्रेम करेन'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT