rakhi sawant aroh welankar vishal nikam meera jagnnath wild card entry in bigg boss marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: मी बिग बॉसची पहिली बायको, इथे माझीच मर्जी.. राखी सावंतचा राडा..

बिग बॉस मराठीच्या घरात आता राखी सावंत, आरोह वेलणकर, विशाल निकम, मीरा जगन्नाथ ही चार नवे सदस्य धुमाकूळ घालायला आले आहेत.

नीलेश अडसूळ

Bigg boss marathi S 4: कालच्या भागात समृद्धी घराबाहेर पडली. त्यानंतर वातावरण काहीसे इमोशनल झालेले असतानाच संपूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला बिग बॉसने एक मोठं सरप्राइज दिलं. आजवर ज्या नावाची चर्चा होती, जिला बिग बॉस मराठीच्या घरात पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते अशी राखी सावंत काल चक्क बिग बॉस मराठीच्या घरात अवतरली. स्पर्धकांसह प्रेक्षकांना ही मोठं धक्काच बसला.

(rakhi sawant aroh welankar vishal nikam meera jagnnath wild card entry in bigg boss marathi 4)

कालच्या भागात घरात एक नाही, दोन नाही तर चार वाइल्ड कार्ड एंट्री झाल्या... आणि यात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांनी बिग बॉसच्या घरात दमदार एंट्री घेतली. आता राखी सोबतच विशाल, मीरा आणि आरोह घरात आल्यानंतर खेळ कसा बदलणार ? त्यांना काय स्पेशल पॉवर मिळणार ? घरातील नाती किती बदलणार ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

राखी सावंतने या आधी हिंदी बिग बॉसचे सिझन गाजवले आहेत... आता तिच्या येण्याने खेळाला तडका लागणार हे नक्की. घरात आलेले हे चैलेंजर्स घरातील सदस्यांच्या गेमला उलटवून लावणार ? घरात नवे ग्रुप तयार होणार ? हे सगळं हळूहळू कळेलच.

राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली, शेवंते... आणि अपूर्वाला हसू फुटले. पुढे ती म्हणाली, तुम्हा सर्वांची आई आहे कारण मी बिग बॉसची पहिली बायको आहे... अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणारच..." त्यामुळे इथे राखी राडा घालणार ही निश्चित. आता बघूया अजून किती सरप्राईझ या चौघांनी राखून राखून ठेवले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT