Rakhi and Adil  Sakal
मनोरंजन

Rakhi Sawant: "माझे पैसे कधी परत करणार?", राखीच्या प्रश्नावर आदिल म्हणतो...

राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदिल खानकडे पैसे मागताना दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

राखी सावंत सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. निधनानंतर राखी सावंतच्या वैवाहिक जीवनात खळबळ उडाली आहे. राखीने पती आदिल खानवर अनेक आरोप केले असून त्याला तुरुंगात पाठवले आहे.

राखीचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती आदिल खानकडे पैसे मागताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिच्यासमोर आदिल खान बसलेला दिसत आहे. राखी व्हिडिओमध्ये विचारत आहे की, तू माझ्याकडून घेतलेले दीड कोटी रुपये कधी देणार आहेस. तर आदिल म्हणतो की चार महिन्यात आणि तेही नफ्यासह, हे ऐकल्यानंतर राखी तिला नफा नको, तिला फक्त तिचा पैसा हवा आहे, जे तिने मेहनतीने कमावले आहे असे म्हणताना दिसते.

आदिल प्रॉफिट तू ठेव पण माझे पैसे मला परत दे, असे ती म्हणताना दिसत आहे. राखी म्हणताना दिसत आहे की, तिने तिचे दागिने विकून हे पैसे दिले आहेत. व्हिडीओमध्ये आदिलच्या हातात औषधही दिसत आहे आणि तो राखीच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अत्यंत बारीक आवाजात देत आहे.

स्मॉल स्क्रीन ड्रामा क्वीन राखी सावंतने अलीकडेच तिचा पती आदिल खान दुर्रानीवर अनेक गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी ७ फेब्रुवारीला आदिलला अटक केली. राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याने आदिल खानबद्दल खुलासा केला आहे.

त्याने सांगितले की, आईच्या निधनाच्या दिवशी आदिल खानने राखी सावंतवर हल्ला केला होता. वृत्तानुसार, राखी सावंतने गेल्या वर्षी 29 मे रोजी आदिल खानसोबत मुस्लिम रितीरिवाजांनुसार लग्न केले होते. यापूर्वी राखीने रितेश राज सिंहसोबत लग्न केले होते, मात्र दोघांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT