Rakhi Sawant Video  esakal
मनोरंजन

Rakhi Sawant Video : बिग बॉसमधून बाहेर पडताच राखीला मोठा धक्का! थेट रुग्णालयातून...

राखीनं नऊ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला. आपण हे पैसे आपल्या आईच्या उपचारासाठी घेत असल्याचे म्हटले होते.

सकाळ डिजिटल टीम

Rakhi Sawant bigg boss marathi 4 finale : बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सांगता झाली. मनोरंजन क्वीन म्हणून जिचे नाव यासगळ्यात तिच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

राखीनं नऊ लाख रुपये घेतले आणि बिग बॉसच्या घरातून काढता पाय घेतला. आपण हे पैसे आपल्या आईच्या उपचारासाठी घेत असल्याचे म्हटले होते. बिग बॉसच्या चाहत्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले. मराठी प्रेक्षकांची मी आभारी आहे. मला समजून घ्या. माझी आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी माझ्याकडे पैसे नाहीत. अशावेळी मला हे पैसे कामाला येतील. असे राखीनं म्हटले आहे.

Also Read - योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

राखीचा प्रवास मोठा संघर्षमय राहिला आहे. बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं देखील काही महिन्यांपूर्वी राखीला मदत केली होती. ज्यावेळी तिची आई रुग्णालयात दाखल होती. राखीनं बॉलीवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिला भलेही कुणी काही का म्हणेनात पण जेव्हा बिग बॉसचे नाव काढले जाते तेव्हा त्यात राखीचे नाव पहिल्यांदा येते.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच राखीनं एक व्हिडिओ शेयर करुन नेटकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या आईला ब्रेन ट्युमर झाल्याचे तिनं म्हटले आहे. चाहत्यांनी त्या पोस्टवर राखीला आधार दिला आहे. काहींनी राखी तू जे काही केले ते बरोबरच होते. असे म्हणत तिचं कौतूकही केलं आहे. राखीनं बिग बॉस मराठीमध्ये वाईल्ड कार्डद्वारे इंट्री केली होती.

बिग बॉस मराठीला हिट करण्यात राखीचे मोठे योगदान आहे. राखीनं जो व्हिडिओ शुट केला आहे तो रुग्णालयातून केला आहे. त्यामध्ये राखीनं आईची तब्येत कशी आहे हेही सांगितले आहे. ते पाहून आणि ऐकून चाहत्यांनी राखीला आधार दिला आहे. राखी जेव्हा बिग बॉस हिंदी मध्ये सहभागी झाली होती तेव्हा देखील तिनं आईच्या प्रकृतीविषयी कुणालाही सांगितले नव्हते.

राखीच्या त्या पोस्टनंतर राहुल वैद्य, अफसाना खान, सोफिया हयात आणि तिच्या इतर सहकाऱ्यांनी देखील तिच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच तिला आधार देत आई लवकर बऱ्या होतील यासाठी प्रार्थनाही केली आहे. राखीसाठी सलमान खान आणि सोहेल खाननं देखील मदत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ला हटवून शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार का केलं? अजित आगरकरने खरं कारण सांगितलं

TRPमध्ये मोठी उलथापालथ! दुसऱ्या स्थानावर घसरण्यापासून थोडक्यात वाचली सायली; टॉप १० मध्ये नव्या मालिकेची एंट्री; वाचा रिपोर्ट

Chandrakant Patil : संध्याकाळपर्यंत जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होणार, चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या आदीच केली घोषणा

Nashik News : सिडकोत 'बॅनर हटाव' मोहीम! नवीन नाशिक महापालिकेची धडक कारवाई; शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यास सुरुवात

Nagpur Crime: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी न्यायालयीन सुनावणीनंतर तुरुंगात

SCROLL FOR NEXT