Rakhi Sawant Birthday singer mika singh did forcibly kissed rakhi sawant on his birthday  sakal
मनोरंजन

Rakhi Sawant Birthday: एक मुका आणि करियर घडलं, मिका आणि राखीच्या ऐतिहासिक किसची गोष्ट

एक मुका आणि घडला इतिहास, मिका आणि राखीच्या करियरला सुसाट नेणाऱ्या बड्डेची आठवण..

सकाळ डिजिटल टीम

Happy birthday rakhi sawant : राखी सावंत नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असते. मग तो मुद्दा तिच्या बॉयफ्रेंडचा असो किंवा सोशल मिडीयावरच्या विचित्र व्हिडीओ असो, ती नेहमीच धुमाकूळ घालत असते. नुकतेच दुबईमध्ये फिल्मफेअर सोहळ्यात तिने केलेल्या लुकची चर्चा झाली होती. अशा कायम चर्चेत असणाऱ्या राखीचा आज 45 वा वाढदिवस. राखी सावंत ही नाव चर्चेत आलं ते एका किसमुळे.. त्याच किसची ही गोष्ट..

(Rakhi Sawant Birthday singer mika singh did forcibly kissed rakhi sawant on his birthday )

आज राखी सावंत अभिनयापासून दूर असली तरी ती मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. पण तिच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात एका कीसने तिला ओळख मिळवून दिला. अर्थात ती किस बळजबरी केल्याचा आरोप राखीने केला होता, आणि तो किस करणारा होता गायक मिका सिंग. या किसने दोघांच्याही करियरला महत्वाचं वळण मिळालं.

मीका सिंग बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायक म्हणून ओळखला जातो. त्यानं आता पर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. पण एक वेळ अशी होती की मिका वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. ही गोष्ट आहे अंदाजे १६ वर्षांपूर्वीची. २००६ मध्ये मीकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला राखी सावंत गेली होती. यावेळी मिकाने सर्वांसमोर राखीला किस केलं आणि हे प्रकरण रातोरात व्हरारल झालं, या घटनेने दोघेही भलतेच चर्चेत आले.

(mika singh kissed rakhi sawant)

पुढे राखीने मिकाची तक्रार करत त्याला आधी पोलीस ठाण्यात आणि मग न्यायालयाची वारी करायला लावली होती. त्यांनतर मिकाचे आणि राखीचे संबंध पूर्णतः बिघडले. यावेळी राखीने संपूर्ण मीडिया दणाणून सोडला होता, तर मोडियानेही राखीला चांगलेच उचलून धरले होते. आयटम सॉन्गवर नाचणारी राखी रातोरात स्टार झाली होती. आणि त्याच दिवसापासून राखी आणि चर्चा हे एक समीकरणच झालं आहे..

ही घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी मीका सिंहनं याबाबत स्वतःच खुलासा केला. एका मुलाखतीत तो म्हणाला होता, मी अंधेरीच्या एका पबमध्ये माझी बर्थडे पार्टी ठेवली होती. या पार्टीसाठी मी काही निवडक लोकांना बोलवलं होतं. यात प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर आशिष शेरवूड सुद्धा सहभागी झाले होते. मी राखीला बोलवलं नव्हतं कारण मला तिचं वागणं माहित होतं. पण ती आशिषसोबत आली होती आणि माझ्यासोबत ओव्हर फ्रेंडली वागत होती.

मिकानं पुढे सांगितलं, पार्टीमध्ये सर्वकाही ठिक चाललं होतं. राखी सुद्धा पार्टी एन्जॉय करत होती. पण तिनं माझ्या चेहऱ्यावर केक लावायचा प्रयत्न केला. मला स्कीन एलर्जी आहे. मी तिला असं करू नको असं सांगितलं होतं पण राखीनं माझ्या चेहऱ्यावर जबरदस्ती केक लावला. मला राग आला आणि रागाच्या भरात तिला धडा शिकवण्यासाठी मी तिला सर्वांसमोर किस केलं. त्यानंतर राखीनं बाहेर जाऊन खूप गोंधळ घातला. याच गोंधळामुळे राखी रातोरात चर्चेचा विषय बनली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कंपनीतून पैशांची पोती घेऊन पळाला... घराखाली ड्रममध्ये पुरले कोट्यवधी रुपये, पोलिसांना कसा लागला सुगावा?

Maharashtra Weather: ‘अर्णव’च्या मार्गात पश्चिमेकडील वारे; चक्रीवादळ किनारपट्टीवर रेंगाळल्याने राज्याला लाभ नाही

नागपुरात भाजपला धक्का! पदवीधर निवडणुकीत नाट्यमय घडामोडी, काँग्रेसचे अभिजीत वंजारी विजयी

IND vs NZ: भारताविरुद्ध आधी मालिका गमावली अन् आता न्यूझीलंडचे दोन प्रमुख गोलंदाज शेवटच्या T20I सामन्यांमधून बाहेर, कारण काय?

Gokul Dairy Employees : नेत्यांसाठी कायपण! 'गोकुळ' निवडणुकीत ताळतंत्र सोडलं; कामावर दांडी मारून प्रचारात फिरणाऱ्या 350 कर्मचाऱ्यांना पाठवल्या नोटिसा, प्रशासकांचा दणका

SCROLL FOR NEXT