rakhi sawant boyfriend adil khan durrani in Bigg Boss Marathi 4 sakal
मनोरंजन

Bigg Boss Marathi 4: राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिल बिग बॉसच्या घरात.. केलं मराठीत प्रपोज..

बॉयफ्रेंडला पाहून राखी खुश.. म्हणाली आजवर जे झालं नाही तर झालं..

नीलेश अडसूळ

rakhi sawant: बिग बॉस मराठीच्या घरात राखी आल्यापासून सदस्यांसोबत ती बरीच धम्माल मस्ती करताना दिसत आहे. कधी ती सदस्यांना आपल्या तालावर नाचायला भाग पाडतेय तर कधी कोणाला आपल्या प्रेमात पडायची जबरदस्ती देखील करताना दिसतेय. आता राखीच ती... काय करेल याचा नेम नाही. तिच्या वागण्याने अक्षरशः हैदोस घातला आहे. पण आज राखी काहीशी रोमॅंटिक होताना दिसणार आहे. कारण आज तीचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रांनी तिला भेटायला बिग बॉस मराठीच्या घरात येणार आहे. राखीसाठी ही एक मोठं सरप्राइज असणार आहे.

(rakhi sawant boyfriend adil khan durrani in Bigg Boss Marathi 4)

बिग बॉसचं घर सध्या भावनिक झालं आहे. कारण 80 दिवस घरच्यांच्या कोणत्याही संपर्काशिवाय बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या घरचे काही क्षणासाठी भेटायला येत आहेत. त्यामुळे एरव्ही भांडणारे कलाकार ही हळवे होऊन रडत आहेत. पण सगळ्या स्पर्धकांचे नातेवाईक भेटायला येत असताना राखीने मात्र आपली खंत व्यक्ती केली होती.

नुकतीच राखी याविषयाला घेऊन भावूक झाली होती, कारण राखीने या आधी बिग बॉसचे बरेच सीजन केले आहेत. पण आजवर तिला कधीही कुणीही भेटायला आलं. त्यामुळे आताही येणार नाही. सगळ्यांच्या घरचे येतात, पण माझ्यासाठी कुणी नाही.. म्हणूनच मी इतकी खंबीर आहे.. असं ती म्हणाली होती. पण तिचे ही स्वप्न बिग बॉस मराठीच्या घरात पूर्ण होणार आहे.

नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये राखीला बिग बॉस म्हणतात राखी तुमच्या घरून कुणीही तुम्हाला भेटायला आलं नाही. त्यावर राखी म्हणजे मला माहीत होतं, असंच होणार आहे. पण अचानक एक दरवाजा उघडून तिचं बॉयफ्रेंड आदिल खान बिग बॉसच्या घरात येतो आणि तिच्यापुढे उभा राहतो. आणि चक्क तिला मराठीत प्रपोज करत म्हणतो 'मी तुझ्यावर खूप प्रेम करतो'.. हे सगळं पाहून राखी भारावून जाते आणि म्हणते असं आजवर कधीही झालं नव्हतं.. त्यावर अपूर्वा म्हणते.. हे बिग बॉस मराठीचं घर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेत मराठीची अब्रू गेली, राज ठाकरेंचा नार्वेकरांवर हल्लाबोल, सत्ताधाऱ्यांची पोलखोल! म्हणाले, मराठी माणसाने विचार करावा ... VIDEO

तृणमूलच्या महिला नेत्याच्या घरी छापा, ३०० तोळे सोन्याचं घबाड; अधिकारी चक्रावले

Sindhudurg Rain Update : 'एल निनो'च्या चिंतेला तूर्त ब्रेक!...अखेर सिंधुदुर्गात मॉन्सून सक्रिय; 30 जूनपर्यंत धो-धो बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

IPL 2027 Trade: आयपीएल इतिहासातील High-Profile डिल! रिषभ पंत १२ कोटींचा तोटा सहन करून 'या' संघाच्या ताफ्यात, कुलदीप यादव LSG कडे

MSRTC Employees DA Hike : एसटी महामंडळाच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा, महागाई भत्ता ५८ टक्क्यांपर्यंत वाढवला; मंत्री सरनाईकांची माहिती

SCROLL FOR NEXT