

Sachin Tendulkar Comments on Vaibhav Sooryavanshi’s Career
Sakal
Sachin Tendulkar Comments on Vaibhav Sooryavanshi’s Career: भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने अगदी कमी वेळात त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. केवळ १४ व्या वर्षी त्याने आयपीएल २०२५ मध्ये पदार्पण केलं होतं.
त्यानंतर त्याने अनेक मोठ्या स्पर्धा खेळल्या असून त्याने २०२६ च्या सुरुवातीलाच १९ वर्षांखालील भारतीय संघाला विश्वविजेतेपद जिंकून देण्यातही मोलाचा वाटा उचलला. त्याने अंतिम सामन्यात पावणेदोनशे धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएल २०२६ मध्ये तर त्याने कमालीचा खेळ करताना ७०० हून अधिक धावा ठोकल्या आणि ऑरेंज कॅपसह ५ मोठे पुरस्कार जिंकले.