Rakhi Sawant Esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: आदिलनं राखीच्या नावाची दिली सुपारी! थेट तुरुंगातुन... आरोप करत म्हणाली,...

Vaishali Patil

राखी सांवत हे बॉलिवूड मधलं असं नाव आहे. ती नेहमी चर्चेत राहण्यासाठी काहीही करते. तिचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपुर्वी ती तिचा पती आदिलमुळे चर्चेत होती. तिने आदिलशी लग्न केलं आणि त्यानंतर तिने धर्मांतर करुन फातिमा नावंही ठेवलं.

त्यानंतर काही दिवसांतच तिने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले. तिने आदिलवर मारहाण आणि फसवणुकीचे आरोप करत त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर आदिलला अटक करण्यात आली आणि त्याला तरुंगातही पाठवण्यात आलं.

आता राखीने पती आदिल खान दुर्रानीवर पुन्हा नवीन आरोप केले आहेत. तिचे म्हणणे आहे की तिचा पती आदिल तिला मारण्याचं प्लॅनिंग करत आहे. इतकच नाही तर तो स्वतः तुरुंगात असल्याने तिने एका व्यक्तीला तिला जिवे मारण्याची सुपारी दिली असल्याचंही तिचं म्हणणं आहे.

ETimes ला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले की, ती शत्रूंपासून दूर राहण्यासाठी प्रार्थना करत आहे. आदिल मला मारण्याचा कट रचत आहे. माझ्या मृत्यूची सुपारी त्यांने तुरुंगातील एका खुन्याला दिली आहे.

पुढे ती म्हणते की, 'मी प्रार्थना करत आहे. मला विश्वास आहे की अल्लाह माझी प्रार्थना नक्कीच स्वीकारेल. यावेळी राखी सावंत पती आदिलला उद्देशून म्हणाली की, तू मला मारू शकत नाहीस, तुला असं का करायचं आहे? माझी संपत्ती आणि बदला घेण्यासाठी?'

इतकच नाही तर राखीच्या म्हणण्यानुसार आदिल तिला रोज फोन करतो आणि तो तिला रोज सांगतो की त्याच राखीवर खुप प्रेम आहे, त्याला परत घेऊन जा. मात्र राखी आदिलला माफ करणार नसून त्याने राखीपासून दुर रहावं असंही तिनं सांगितलं.

यावेळी राखीने एक व्हॉईस नोट देखील शेअर केली आहे ज्यामध्ये एक व्यक्ती राखीला सतर्क करत आहे. ती व्यक्ती म्हणते, 'मला नुकतेच जे कळले ते मला सांगायचे आहे. मला माझी ओळख लपवायची आहे आणि मी तुझा शुभचिंतक आहे.

आदिलच्या खोलीत काही लोक आहेत, त्यांने तुला मारण्यासाठी काही लोकांना सुपारी दिली आहे. गेल्या काही काळापासून ते याचं प्लनिंग करत आहेत.

तो तुला अधीक्षकांसमोरही जबाबदार धरत होता आणि सर्व पोलिसांनी खरेदी करण्यासाठीही तयार होता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT